रिंगणगाव (एरंडोल), 4 ऑगस्ट : महसूल सप्ताहाच्या निमित्ताने एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे दिनांक 2 ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ओपन स्पेस, कब्रिस्तान परिसर, जिल्हापरिषद शाळेचे आवार तसेच अतिक्रमणमुक्त रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्यात आली.
यावेळी रिंगणगावचे सरपंच, ग्राम महसूल अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेत शासनाच्या या उपक्रमाला यशस्वी केले. पर्यावरण संवर्धन व हरितग्रामनिर्मितीसाठी झाडांचे महत्त्व पटवून देत ग्रामस्थांनी एकजुटीने रोपांची लागवड केली.
सदर उपक्रमामुळे परिसरात हरित पट्टा वाढून पर्यावरणात्मक समतोल राखण्यास मदत होणार आहे. तसेच झाडांमुळे जमिनीची धूप थांबेल आणि पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी मदतशीर असेल. झाडांची सावली व थंडावा तापमान कमी करण्यास मदत होईल. हिरवळ मानसिक तणाव कमी करून मन प्रसन्न ठेवते. झाडांपासून लाकूड, फळे, औषधी वनस्पती मिळतात, त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही ते फायदेशीर ठरणार आहे.