• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Update : उत्तरकाशीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन तातडीने उत्तराखंडला रवाना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 7, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, देश-विदेश
Update : उत्तरकाशीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन तातडीने उत्तराखंडला रवाना

मुंबई, 7 ऑगस्ट : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील 151 पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे तातडीने उत्तराखंडकडे रवाना झाले असून, आज सायंकाळी साडेचार वाजता ते देहरादून येथे दाखल होत आहेत.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष (SEOC), महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अडकलेल्या 151 पैकी 120 पर्यटकांशी संपर्क झालेला असून ते सुरक्षित स्थळी आहेत. उर्वरित 31 पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र हे उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष (DEOC उत्तरकाशी) तसेच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (NERC), नवी दिल्ली यांच्याशी सतत समन्वय साधून आहे.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव,यांनी आज अपर मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग) यांच्यासमवेत मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्र येथे परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आनंद बर्धन, मुख्य सचिव, उत्तराखंड यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ती तातडीची मदत करण्याबाबत विनंती केली. संचालक (आपत्ती व्यवस्थापन), उत्तराखंड यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार बचाव कार्यासाठी खालील उपाययोजना करण्यात येत आहेत.


धाराली परिसरातील सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरद्वारे हर्षल हेलीपॅड येथून गंगोत्री येथे स्थलांतरित केले जाणार आहे. गंगोत्री ते धराली मार्गावर बस/अवजड वाहनांची व्यवस्था आणि धराली ते हर्षील दरम्यान पायी प्रवासाचे नियोजन आहे. गंगोत्री ते हर्षील दरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी 10 आयटीबीपी (ITBP) पथकांची तैनाती करण्यात आली असून प्रत्येक पथक 30 पर्यटकांना संरक्षण देणार आहे. लष्कर, NDRF, SDRF आणि स्थानिक बचाव पथके सध्या धराली परिसरात कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा आणि रस्ते अद्याप पूर्ववत झाले नसून, त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

NERC च्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून लष्कराच्या छोट्या सॉर्टींमार्फत स्थलांतर सुरू आहे. बचाव कार्यासाठी उत्तराखंडमध्ये उपग्रह फोन (Satellite Phone) तैनात करण्यात आले असून श्री. राजीव स्वरूप, IGP हे जबाबदार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पर्यटकांचे शेवटचे स्थान समजण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांना सूचित करण्यात आले असून त्यांच्या मदतीने शोधकार्य सुलभ होईल. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र हे आवश्यक समन्वय साधून बचाव, मदत आणि कुटुंबीयांना माहिती पुरविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.

 

संपर्क यंत्रणा:

 

  • 1. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र

संपर्क: 93215 87143 / 022-22027990 / 022-22794229

 

  • 2. डॉ. भालचंद्र चव्हाण,

संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, महाराष्ट्र

मोबाईल: 9404695356

 

  • 3. उत्तराखंड राज्य आपत्कालीन कार्य केंद्र

संपर्क: 0135-2710334 / 8218867005

 

  • 4. श्री. प्रशांत आर्य,

जिल्हाधिकारी, उत्तरकाशी

मोबाईल: 9412077500 / 8477953500

 

  • 5. मेहेरबान सिंग,

समन्वय अधिकारी

मोबाईल: 9412925666

 

  • 6. श्रीमती मुक्ता मिश्रा,

सहायक जिल्हाधिकारी, उत्तरकाशी

मोबाईल: 7579474740

 

  • 7. जय पनवार,

आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड

मोबाईल: 9456326641

 

  • 8. सचिन कुरवे,

समन्वय अधिकारी

मोबाईल: 8445632319

 

हेही वाचा : जळगाव जिल्हा वासियांसाठी खुशखबर! पुण्याला जाण्यासाठी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस, ‘असे’ आहे वेळापत्रक

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajanmaharashtra tourists strandedmarathi newssuvarna khandesh liveuttarkashiuttarkashin flash food

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक

महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक

August 10, 2025
“….तर जिल्हाधिकारी अन् एसपी जबाबदार!” वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय म्हणाले?

“….तर जिल्हाधिकारी अन् एसपी जबाबदार!” वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय म्हणाले?

August 10, 2025
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2025
मोठी बातमी! पाडळसरे धरण प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सामाविष्ट; 859 कोटींच्या निधीला मंजुरी

मोठी बातमी! पाडळसरे धरण प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सामाविष्ट; 859 कोटींच्या निधीला मंजुरी

August 8, 2025
धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात पणन मंत्री जयकुमार रावल यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन 

धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात पणन मंत्री जयकुमार रावल यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन 

August 8, 2025
पैसे देण्याची कार्यवाही गतीने करून ठेवीदारांना दिलासा द्यावा – गृह राज्यमंत्री योगेश कदम

पैसे देण्याची कार्यवाही गतीने करून ठेवीदारांना दिलासा द्यावा – गृह राज्यमंत्री योगेश कदम

August 8, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page