जळगाव, 9 ऑक्टोबर : आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून मागील आठवड्यात जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यानंतर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांसाठी देखील आरक्षण सोडत पार पडली. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यातील 15 पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आली आहे.
पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर –
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीतून संबंधित पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर नियमांनुसार पार पडली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, बैठकीस नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोणती पंचायत समिती कोणासाठी आरक्षित? –
- पारोळा – अनुसूचित जाती (महिला)
- बोदवड – अनुसूचित जमाती (महिला)
- भुसावळ – अनुसूचित जमाती
- चोपडा – अनुसूचित जमाती
- अमळनेर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
- एरंडोल – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
- रावेर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
- मुक्ताईनगर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
- चाळीसगाव – सर्वसाधारण – महिला
- जळगाव – सर्वसाधारण – महिला
- जामनेर – सर्वसाधारण – महिला
- धरणगाव – सर्वसाधारण – महिला
- यावल – सर्वसाधारण
- पाचोरा – सर्वसाधारण
- भडगांव – सर्वसाधारण
हेही वाचा : Breaking! जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार