• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Video | ‘जय श्रीराम’चा उल्लेख; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद साधताना सांगितले श्रद्धेचं महत्व

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 6, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Video | ‘जय श्रीराम’चा उल्लेख; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद साधताना सांगितले श्रद्धेचं महत्व

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार 5 नोव्हेंबर रोजी लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भारतीय महिला विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली. पंतप्रधानांनी खेळाडूंना त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करत स्पर्धेत सलग तीन पराभवांनंतर संघाच्या उल्लेखनीय पुनरागमनाचे कौतुक केले. यावेळी तुमच्या संघाने केवळ मैदानावरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या हृदयात स्थान मिळवले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद –

तत्पुर्वी, पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या विजयाबद्दल सोशल मीडियावरुन अभिनंदन आणि कौतुक केलं होतं. दरम्यान, मैदानावर भारतीय संघाच्या पोरींनी दाखवलेल्या धाडसी आणि शानदार खेळीचं बुधवारी पुन्हा एकदा कौतुक केलं. या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत मुक्तपणे संवाद साधला. तसेच यशस्वी होण्याइतकेच तंदुरुस्त राहणे देखील महत्त्वाचे असल्याचे खेळाडूंना पंतप्रधांनी सांगितले.
दीप्ती वर्मासोबत बोलताना ‘जय श्रीराम’चा उल्लेख –

वर्ल्ड चॅम्पियन्स सोबतच्या संवादादरम्यान, वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू दीप्ती शर्माने पंतप्रधान मोदींना सांगितले की, ती 2017 पासून त्यांना भेटण्याची वाट पाहत होती. त्यावेळी त्यांनी आमच्या भारतीय संघाला स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहण्याचे आवाहन केले होते आणि आज ते स्वप्न वास्तवात उतरले आहे. दरम्यान, मी नेहमीच तुमची भाषणे ऐकत असते आणि तुमची शांतपणे काम करण्याची पद्धत ही मला खेळातही मदत करते, असेही दिप्ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दीप्ती शर्माच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलेले “जय श्री राम” आणि तिच्या हातावर भगवान हनुमानाच्या टॅटूचा उल्लेख केला. त्यावेळी दीप्ती हसली आणि म्हणाली की हेच मला शक्ती देते. दरम्यान, श्रद्धा आपल्या जीवनात खूप काही करत असते, असे याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले.

आम्हाला पंतप्रधानांना पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल –

या संवादात कर्णधार हरमनप्रीत कौरने 2017 मध्ये पंतप्रधानांना भेटल्याची आठवण सांगितली. ती म्हणाली की, 2017 मध्ये आम्ही तुमच्यासोबत भेटलो होते. परंतु, त्यावेळी आमच्याकडे ट्रॉफी नव्हती. आता आमच्याकडे ट्रॉफी देखील आली आहे. आम्हाला पंतप्रधानांना पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल, असेही ती म्हणाली.

हेही वाचा : भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; खान्देशात कोणाला मिळाली जबाबदारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: icc women world cup 2025indian womens cricket teammarathi newsNew Delhipm narendra modisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page