• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नागपूर हिवाळी अधिवेशन 2025 : राज्यातील गुटखा बंदीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 9, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Nagpur Winter Session 2025: Chief Minister Devendra Fadnavis' big decision to ban gutkha in the state, important information given in the Assembly

नागपूर हिवाळी अधिवेशन 2025 : राज्यातील गुटखा बंदीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नागपूर, 9 डिसेंबर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले असून आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान आजच्या या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची घोषणा केली. राज्यात गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करुन ते अधिक कठोर करणार असल्याची घोषणा त्यांनी आज विधानसभेत केली.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. कायद्यातील तरतुदींनुसार ‘हार्म आणि हर्ट’ या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

या विधानसभा सदस्यांनी उपस्थित केला गुटखाबंदीचा मुद्दा – 

विधानसभा सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख, अमीन पटेल यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा, विक्री व वहन संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

राज्यात गुटखा बंदी आहे. गुटखा विक्री व वहन संदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यांमध्ये एकूण शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली आहे. यात नवी मुंबईत 1,144, अहिल्यानगर येथे 185, जालना 90, अकोला 35, नाशिक 131, चंद्रपूर 230, सोलापूर 108, बुलढाणा 664 तसेच नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत 1,706 गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

शाळा किंवा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात गुटखा विक्रीचे प्रकार आढळल्यास त्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने केली जाणार आहे. तसेच ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्रांची आवश्यकता आहे. मुंबई महानगरमध्ये दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असून शासन यासंदर्भात आवश्यक पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisnagpurnagpur newsnagpur winter sessionnagpur winter session 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“राष्ट्रनिर्माणासाठी युवा वर्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक”: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

“राष्ट्रनिर्माणासाठी युवा वर्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक”: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

December 18, 2025
“श्री राम सुतार जी यांच्या निधनाने मन अत्यंत दुःखी!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून वाहिली श्रद्धांजली

“श्री राम सुतार जी यांच्या निधनाने मन अत्यंत दुःखी!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून वाहिली श्रद्धांजली

December 18, 2025
महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

December 17, 2025
Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

December 16, 2025
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

December 15, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

December 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page