मुंबई, 19 डिसेंबर : राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी आज शनिवार 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
मतदानाला सुरूवात –
राज्यातील 23 नगरपरिषद व नगर पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी व सदस्यपदांसाठी तसेच 143 सदस्यपदांच्या जागांसाठी आज, शनिवारी निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रचाराची मुदत शुक्रवारी रात्री दहा वाजता संपली असून आज शनिवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहील.
उद्या मतमोजणी –
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. त्यानुसार, 2 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. सर्व संबंधित ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.






