• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मतदारांचा कौल चर्चेत! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ सात नगरपरिषदेत धक्कादायक निकाल, वाचा Special Report

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 22, 2025
in जळगाव जिल्हा, चाळीसगाव, ताज्या बातम्या, धरणगाव, पाचोरा, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर
मतदारांचा कौल चर्चेत! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ सात नगरपरिषदेत धक्कादायक निकाल, वाचा Special Report

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 22 डिसेंबर : राज्यातील नगरपरिषदत तसेच नगरपंचायतींच्या मतदानाची मतमोजणी काल 21 डिसेंबर रोजी पार पडली असून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणात विजय मिळवत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपरिषद तसेच 2 नगरपंचायतींमध्ये भाजपचे सर्वाधिक 8 नगराध्यक्ष तर शिंदेंच्या शिवसेनेचे 6 तर भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 यावल, धरणगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 तसेच अपक्ष 1 नगराध्यक्ष निवडून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सात नगरपरिषदांचा निकाल धक्कादायक –

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, पाचोरा, भडगाव तसेच चाळीसगाव या नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला. याठिकाणी मतदारांनी दिलेल्या कौल हा चर्चेचा विषय ठरलाय. यामध्ये मुक्ताईनगर, अमळनेर, पाचोरा तसेच भडगाव या नगरपरिषदेत शिंदेंच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवत मोठा विजय मिळवलाय. तर चाळीसगावमध्ये भाजपने वर्चस्व कायम राखलंय. यासोबत भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने तर धरणगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने नगराध्यक्षपदावर विजय मिळवलाय.

मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंसह भाजपला धक्का –

मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीचा मतदानाचा दिवशी पार पडलेल्या घडामोडींमुळे चर्चेत आली होती. याठिकाणी भाजप विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत होती. भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली होती. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या स्वतः नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याने शिवसेनेने देखील मोठं आव्हान भाजपसमोर उभं केलं होतं.

शिवसेनेकडून संजना पाटील यांना 8 हजार 922 तर त्यांच्याविरोधातील भाजप उमेदवार भावना ललित महाजन यांना 6 हजार 486 इतकी मते मिळाली. यामध्ये संजना पाटील यांचा 2 हजार 486 मतांनी विजय झाला. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबियांसह भाजपला धक्का देत मुक्ताईनगर नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेने वर्चस्व सिद्ध केलंय.

भुसावळमध्ये मंत्री संजय सावकरेंना धक्का –

महायुती सरकारमधील मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. त्यांना 40 हजार 429 इतके मत मिळाली. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना 42 हजार 275 इतकी मिळाली. यामध्ये गायत्री भंगाळे यांचा 1 हजार 846 मतांनी विजय झाला. दरम्यान, भुसावळमध्ये 1 हजार 846 मतांनी पत्नी रजनी सावकारे यांचा झालेला पराभव हा मंत्री संजय सावकारेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.

धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांना धक्का –

धरणगाव नगरपरिषद निवडणुकीत शिंदेंची शिवसेना विरूद्ध ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत रंगल्याची पाहायला मिळाली. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मतदारसंघात धरणगाव नगरपरिषदेचा समावेश असल्याने याठिकाणी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगड आव्हान दिलं.

दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी धरणगाव शहर विकास आघाडीच्या उमेदवार लीलाबाई सुरेश चौधरी यांना 12 हजार 917 तर त्यांच्याविरोधातील महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली विनय भावे यांना 10 हजार 579 इतकी मते मिळाली. दरम्यान, मतदारांनी दिलेल्या कौलमुळे लीलाबाई चौधरी यांचा 2338 मतांनी विजय झाल्याने धरणगाव नगरपरिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झालंय. यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

अमळनेरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा विजय –

नगरपरिषद निवडणुकीपुर्वीच, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत अजित दादांची राष्ट्रवादी विरूद्ध शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत रंगल्याचे पाहायला मिळाले. नगराध्यक्षपदाचे शिवसेना उमेदवार डॉ. परिक्षित बाविस्कर 30 हजार 856 तर अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना 22 हजार 208 इतकी मते मिळाली. यामध्ये शिवसेनेच्या डॉ. परिक्षित बाविस्कर यांचा 8 हजार 648 मतांनी विजय झाला. दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेला मोठं यश मिळवून देत आमदार अनिल पाटील यांच्यासह राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय.

पाचोरा-भडगावमध्ये आमदार किशोर आप्पांचे वर्चस्व कायम –

पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भाजपसोबत युती करणार नसल्याचे सांगत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यामध्ये, पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. यावेळी शिवसेना विरूद्ध भाजप अशी थेट लढत रंगल्याचे दिसून आले. पाचोरा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिताताई पाटील यांना 25 हजार 865 तर भाजप उमेदवार सुचेताताई वाघ यांना 14 हजार 517 इतकी मते मिळाली. दरम्यान, सुनिताताई पाटील यांचा 11 हजार 348 मताधिक्याने विजय झाला.


तर दुसरीकडे भडगाव नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या शिवसेना उमेदवार रेखा मालचे 12 हजार 955 यांना तर सुशिला पाटील यांना 11 हजार 444 इतकी मते मिळाली. दरम्यान, शिवसेनेच्या रेखा मालचे यांचा 1 हजार 511 मतांनी विजय झाला. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने मोठी रणनिती आखली होती. मात्र, पाचोरा-भडगावमध्ये शिवसेनेने निर्वावाद यश मिळवल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांचे वर्चस्व कायम राहिलंय.

चाळीसगावमध्ये मतदारांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास –

चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण तर शहर विकास आघाडीकडून माजी आमदार दिवंगत राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होत्या. निवडणुकीच्या काही दिवसांपुर्वी, राजीव देशमुख यांचे निधन झाल्याने पद्मजा देशमुख ह्या निवडणूक लढवत होत्या. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव नगरपरिषदेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली. यासोबतच, माजी खासदार उन्मेश पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात आरोप-प्रत्यारोपांवरून ही निवडणूक अधिकच रंगतदार बनली.

दरम्यान, प्रतिभा चव्हाण यांना 32 हजार 238 तर पद्मजा देशमुख 26 हजार 226 यांना इतकी मते मिळाली. यामध्ये प्रतिभा चव्हाण यांचा 6 हजार 12 मतांनी विजय झाला. दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास कायम ठेवत भाजपला मोठा विजय मिळवून दिलाय.

जळगाव जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार –

  • गायत्री भंगाळे – भुसावळ – राष्ट्रवादी (शरद पवार गट)
  • संजना पाटील – मुक्ताईनगर – शिवसेना
  • छाया पाटील – यावल – शिवसेना (ठाकरे गट)
  • प्रतिभा चव्हाण – चाळीसगाव (भाजप)
  • सुनिता पाटील – पाचोरा (शिवसेना)
  • साधना महाजन – जामनेर (भाजप)
  • डॉ. परीक्षित बाविस्कर – अमळनेर – शिवसेना
  • नम्रता पाटील – चोपडा – शिवसेना
  • गोविंद अग्रवाल – शेंदुर्णी – भाजप
  • रेखा मालचे – भडगाव – शिवसेना
  • लीलाबाई चौधरी – धरणगाव – शिवसेना (ठाकरे गट)
  • दामिनी सराफ – फैजपूर – भाजप
  • चंद्रकांत पाटील – पारोळा – शिवसेना
  • डॉ. नरेंद्र ठाकूर – एरंडोल – भाजप
  • रेणुका पाटील – सावदा – भाजप
  • सुनिल काळे – वरणगाव – अपक्ष
  • योगेश पाटील – नशिराबाद – भाजप
  • संगीता महाजन – रावेर – भाजप

हेही वाचा : आमदार किशोर आप्पा पाटील यांनी करून दाखवलं! पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीत मिळवला शिवसेनेने ऐतिहासिक विजय

बातमी शेअर करा !
Share
Tags: election updatejalgaon newsmarathi newsnagarparishad electionspecial Reportsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘More from Less for More’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘More from Less for More’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

December 22, 2025
उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 22, 2025
नगरपरिषद निवडणूक निकाल 2025; महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून मानले मतदारांचे आभार

नगरपरिषद निवडणूक निकाल 2025; महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून मानले मतदारांचे आभार

December 22, 2025
मतदारांचा कौल चर्चेत! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ सात नगरपरिषदेत धक्कादायक निकाल, वाचा Special Report

मतदारांचा कौल चर्चेत! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ सात नगरपरिषदेत धक्कादायक निकाल, वाचा Special Report

December 22, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी करून दाखवलं! पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने मिळवला ऐतिहासिक विजय

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी करून दाखवलं! पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने मिळवला ऐतिहासिक विजय

December 21, 2025
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

December 20, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page