जळगाव, 12 ऑगस्ट : जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या 13 ऑगस्ट 2023 रोजी पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदांसाठी जळगाव जिल्ह्यातील 8 परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12.30 आणि दुपारी 3ते 4 यावेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे.
परीक्षा केंद्र परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) चे मनाई आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत. परिक्षा केंद्राजवळच्या 50 मीटरच्या आतील परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने हे वर परीक्षा कालावधीत पेपर सुरू झाले पासून ते पेपर संपेपर्यंतच्या बंद ठेवणेत राहतील.
सकाळ सत्रात पोलीस पाटील व दुपार सत्रात कोतवाल या पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रतिबंधात्मक आदेश परीक्षार्थी, नियुक्ती अधिकारी -कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांच्या साठी लागू होणार नाही. असे उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी कळविले आहे.