जळगाव, 16 जानेवारी : राज्यात महानगरपालिका निवडणुकींच्या धामधूम अंतिम टप्प्यात पोहचली असून गेल्या महिनाभरापासून झालेल्या घडामोडींनंतर काल 15 जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान पार पडले. यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
जळगाव शहरात एकूण 53.59 टक्के इतके मतदान झाले असून आता निकालाकडे संपुर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीची आकडेवारी लाईव्ह…
अखेर जळगाव महानगरपालिकेत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामध्ये जळगावमध्ये 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजप 46, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 जागेवर विजय झाला आहे.
प्रभाग क्रमांक 17 मधील ठाकरे गटाचे चारही उमेदवार तर प्रभाग सहा मधील 1 असे शिवसेना ठाकरे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेवर 69 जागांसह महायुतीचा झेंडा फडकला आहे.
सविस्तर बातमी अपडेट होत आहे….
प्रभाग 8 अ – भाजपच्या कविता पाटील विजयी
प्रभांग 10 ड – जाकीर खान पठाण विजयी
12.50 – प्रभाग 15 – भाजपचे अरविंद देशमुख, चेतन शिरसाळे, अरविंद देशमुख, प्रकाश रावलमल बालानी आणि शिवसेनेच्या रेशमा कुंदन काळे विजयी
12.25 – प्रभाग 4 ब – विद्या मुकुंदा सोनवणे विजयी
12.15 – प्रभाग 4 ड – पियूष कोल्हे विजयी
प्रभाग ।। मधील महायुतीचे सर्व उमेदवार विजयी – विजयी झालेल्या उमेदवारांची नावे – शिवसेनेचे ललित विजय कोल्हे, सिंधूताई विजय कोल्हे, डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे आणि संतोष मोतीराम पाटील
प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीचे नितीन सपके, सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर हे तिघे उमेदवार विजयी
प्रभाग 5 मधील महायुतीचे सर्व उमेदवार आघाडीवर तर 4 ड चे उमेदवार पियुष ललित कोल्हे यांची 5 हजार मतांची मोठी आघाडी
प्रभाग क्रमांक 4 ‘ब’ विद्या मुकुंदा सोनवणे विजयी
प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपाचे उमेदवार अरविंद देशमुख विजयी
प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीचे नितीन सपके, सुरेखा तायडे हे उमेदवार विजयी






