• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 2, 2026
in जळगाव जिल्हा, चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

जळगाव, 2 मार्च : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून पारंपरिक होळी उत्सवात सहभाग घेणार आहेत. तसेच वर्डी (ता. चोपडा) येथे आयोजित ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषदे’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

आदिवासी विकास परिषदेचे आयोजन –

दौऱ्यानुसार मंत्री वुईके सकाळी साडेसात वाजता शिरपूर येथून बोऱमळी (ता. चोपडा) येथे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता बोऱमळी येथे आगमनानंतर ते आदिवासी बांधवांच्या पारंपरिक होळी उत्सवात सहभागी होणार आहेत. आदिवासी संस्कृतीचा सन्मान व परंपरांशी नाळ दृढ करणे हा या सहभागाचा मुख्य उद्देश आहे.

दुपारी साडेबारा वाजता वर्डी (ता. चोपडा) येथे आदिवासी विकास विभागातर्फे भव्य ‘आदिवासी विकास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती आदिवासी घटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून विविध विकास कामांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून मंत्री वुईके यांची त्यास भेट देणार आहेत.

आदिवासी विकास मंत्र्यांचे होणार उद्घाटन –

परिषदेत मंत्री वुईके आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा व विकासविषयक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. तसेच शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, रोजगार यांसारख्या विषयांवर शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, सकाळी साडेअकरा वाजता वर्डी येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा संजीव समाधी मंदिर येथे पूजन कार्यक्रमास मंत्री वुईके उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आदिवासी विकास परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

या  सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री  रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार स्मिता वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.

हेही वाचा: विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda taluka latest newssuvarna khandesh livetribal development departmenttribal welfare development counciltribal welfare scheme

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page