चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 17 जानेवारी : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. यासोबत शिंदेंच्या शिवसेनेने देखील अपेक्षित असे यश मिळवलंय. यामध्ये जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 46 जागा जिंकून आघाडी मिळवलीय. दरम्यान, जळगाव जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या टॉप-5 उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे…
जळगावात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या टॉप-5 उमेदवार –
- अरविंद भगवान देशमुख (प्रभाग क्र. 15 – अ) – 10 हजार 722
- सुनिल वामनराव खडके (प्रभाग क्र. 16 – ड) – 10 हजार 688
- पियुष ललित कोल्हे (प्रभाग क्र. 4 – ड) – 9 हजार 558
- रेश्मा कुंदन काळे (प्रभाग क्र. 15 – क ) – 9 हजार 478
- बालानी प्रकाश रावलमल (विकी) (प्रभाग क्र.15 – ड) – 9 हजार 260
अरविंद देशमुखांना मिळालं सर्वाधिक मताधिक्य –
जळगाव महानगरपालिकेत अरविंद देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्र. 15 अ मधून निवडणूक लढवली. दरम्यान, या प्रभागात जनतेने त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे त्यांना 10 हजार 722 इतके सर्वाधिक मताधिक्य मिळालं. अरविंद देशमुख हे जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक तथा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय्य सहाय्यक देखील आहेत. जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेत ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, आपत्तीकाळात अनेक जणांच्या मदतीला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे.
View this post on Instagram
जळगावात भाजपचं निर्विवाद यश –
जळगाव महानगरपालिकेत भाजपने, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन्ही पक्षांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली. यामध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 46 जांगा जिंकल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेने 22 आणि अजित दादांची राष्ट्रवादीने 6 पैकी 1 जागेवर विजय मिळवलाय. यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून जळगावात भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलंय. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 उमेदवार निवडून आले आहेत. तर एका अपक्ष उमेदवाराने देखील विजय मिळवलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि एमआयएम पक्षाचा एकही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.
हेही वाचा : खान्देशातील जळगाव-धुळे महानगरपालिकेत ‘भाजपचं टॉप’; ‘असा’ आहे निवडणुकीचा संपुर्ण निकाल






