• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजनांसाठी निधी लवकरच; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजनांसाठी निधी लवकरच; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई, 17 मार्च: राज्यातील जलजीवन मिशन अंतर्गत एकूण ५१,५६० पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यापैकी २६,४९९ योजना पूर्ण झाल्या आहेत उर्वरित २५,०६१ योजनांची कामे प्रगतीपथावार आहेत. अपूर्ण योजनांसाठी केंद्र शासनाकडून लवकरच निधी प्राप्त होणार आहे अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली. या संदर्भात विधानसभा सदस्य सुभाष देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत उर्वरित योजनांपैकी ७५ ते ९९ टक्के प्रगती झालेल्या ६,४०९ योजनांसाठी सुमारे १२,१८६ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे, तर ५१ ते ७५ टक्के प्रगती झालेल्या ८,३२४ योजनांसाठी सुमारे १२,६५० कोटी रुपयांची गरज आहे. तसेच २६ ते ५० टक्के प्रगती झालेल्या योजनांवर आतापर्यंत सुमारे १,७८२ कोटी रुपये खर्च झाले असून त्या पूर्ण करण्यासाठी आणखी सुमारे ५,४२२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारने जल जीवन मिशन या योजनेची मुदत डिसेंबर २०२८ पर्यंत वाढविली असून देशातील एकूण निधीचा आराखडा ३ लाख ५९  हजार  कोटी रुपयांवरून ८ लाख ६९ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील म्हणाले की, या योजनेत महाराष्ट्राचा सुमारे दोन टक्के हिस्सा अपेक्षित असून सुमारे १६ हजार कोटी रुपये केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र केंद्राकडील निधीची प्रतीक्षा न करता राज्य शासनाने आतापर्यंत ४८०० कोटी रुपये देऊन प्रलंबित देयके अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांत केंद्रासोबत सामंजस्य करार (एमओयू) व इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी उपलब्ध होईल आणि ७५ ते ९९ टक्के तसेच ५० ते ७५ टक्के प्रगती झालेल्या योजनांना प्राधान्याने निधी देऊन त्या लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य संजय गायकवाड, शेखर निकम, रत्नाकर गुट्टे, भास्कर जाधव, तानाजी मुटकुळे, समीर मेघे, नारायण कुचे, समीर मेघे, डॉ. किरण लहामटे यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा: पाचोरा-भडगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांसाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटींचा निधी मंजूर – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: budget 2026jal jeevan mission schemesmarathi newsminister gulabrao patilsuvarna khandesh livevidhansabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page