• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News: पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 4, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon News: पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

जळगाव, 4 ऑगस्ट: जळगाव शहरालगत पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे  खचला होता. या पुलाची राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल 3 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून प्रशासनाला महत्वाचे निर्देश –

पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलाच्या संरचनेला झालेल्या नुकसानीची आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित यंत्रणेला नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.

मंत्री गिरीश महाजन यांनी साधला दूरध्वनीद्वारे संपर्क –

पाहणीदरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या पुलाची तातडीने तांत्रिक पाहणी करण्यासाठी केंद्रीय तज्ज्ञ पथक पाठविण्यात यावे, नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दुरुस्तीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच नागरिकांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुलाच्या परिसरातील परिस्थिती, वाहतुकीवरील परिणाम तसेच प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती  दिली. पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन करून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचेही यावेळी सांगितले. जळगावचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यूरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती बेकायदेशीर; तक्रार करताच होणार कठोर कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian minister gulabrao patiljalgaon newspaldhi-tarsod bypasssuvarna khandesh livewater resources minister girish mahajan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

August 11, 2026
Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

August 11, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

August 11, 2026
जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 11, 2026
जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page