• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी भूजल पुनर्भरण हाच प्रभावी पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 21, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी भूजल पुनर्भरण हाच प्रभावी पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, 21 मे: राज्यात शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी भूजल पुनर्भरण हा एकमेव प्रभावी पर्याय असून मोठ्या प्रमाणावर पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविणे काळाची गरज असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भूजल पुनर्भरणाच्या कामांसाठी नियमित आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन विभागामार्फत शासन निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच डीपीडीसी (जिल्हा नियोजन समिती) निधी आणि मायनिंग विभागाच्या निधीचा वापर या कामांसाठी करण्यात यावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविणे महत्त्वाचे –

मंत्रालयात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे भूजल पुनर्भरणाची कामे करण्यासाठी नियमित निधी उपलब्ध करून देणे तसेच त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रधान सचिव पराग जैन यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जलधरांमध्ये प्रभावी आणि मोठ्या प्रमाणावर भूजल पुनर्भरण होण्यासाठी थेट भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने रिचार्ज शाफ्ट, रिचार्ज शाफ्टसह रिचार्ज ट्रेंच, छतावरील पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण यांसारख्या उपायांचा समावेश आहे.

या उपाययोजनांमुळे पावसाचे नदी-नाल्यांतून वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून अधिक प्रभावीपणे भूजल पुनर्भरण करता येते. विविध योजनांअंतर्गत अशा उपाययोजना यापूर्वी राबविण्यात आल्या असून त्यामुळे जलस्रोत बळकटीकरणासह भूजल पातळी वाढविण्यास मोठा फायदा होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील भूजल पातळी स्थिर करणे व वाढविणे, अतिशय शोषित व अंशतः शोषित क्षेत्रांची संख्या कमी करणे, टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या टप्प्याटप्प्याने घटविणे तसेच पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण करून पाण्याची शाश्वतता वाढविणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

हेही वाचा: उपनिबंधकासह खासगी इसम Anti Corruption पथकाच्या जाळ्यात; दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: groundwatermarathi newsminister gulabrao patilsustainable water supplysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page