• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

प्रथमच निघालेल्या दिंडीचे पंचक्रोशीत वेगळे आकर्षण; २० दिवसांत सुमारे ५०० किमी पायी प्रवास

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 5, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

ईसा तडवी, प्रतिनिधी

सातगाव डोंगरी (ता. पाचोरा), 5 जुलै: वारकरी परंपरा आणि गोसेवेचा अनोखा संगम घडवत सातगाव डोंगरी येथून प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘निर्लोभ पायी दिंडी’ शुक्रवारी मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाली. या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे दिंडीसोबत देशी गाय आणि वासराही विठुरायाच्या दर्शनासाठी पायी मार्गस्थ झाले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण पंचक्रोशीत दिंडीची मोठी चर्चा रंगली आहे.

दिंडीचा शुभारंभ गोसेवक तथा दिंडीचे आयोजक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक वातावरणात झाला. यावेळी गावातील वंदना उत्तमराव पाटील यांच्या हस्ते गाय-वासराचे हळद-कुंकू, फुले वाहून व ओवाळणी करून पूजन करण्यात आले. गोमातेच्या गळ्यात तुळशीचा हार घालून कपाळावर गंध लावण्यात आला. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष बन्सीलाल इंदरचंद जैन, ज्येष्ठ प्राध्यापक भागवत महालपुरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी दिंडीला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. बन्सीलाल जैन यांनी, “गोमातेसह निघणारी ही दिंडी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श असून कृषी संस्कृती आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम आहे,” असे सांगितले.

प्रा. भागवत महालपुरे यांनी सातगाव डोंगरीकरांनी निर्लोभ वारीचा संकल्प जपत इतिहास घडविल्याचे गौरवोद्गार काढले. तर मधुकर काटे यांनी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देत हिरवा झेंडा दाखवून दिंडीला रवाना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. आर. वाघ यांनी केले. या प्रसंगी परिसरातील विविध भजनी मंडळे, नांदगाव, तिडका, वाकडी येथील टाळकरी, गावातील महिला, युवक तसेच शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांच्या वर्षावात आणि भक्तिमय वातावरणात दिंडीने विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान केले.

वारकऱ्यांकडून कोणतीही वर्गणी नाही –

दिंडीचे आयोजक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले की, ही पूर्णपणे निर्लोभ पायी दिंडी असून सहभागी वारकऱ्यांकडून एक रुपयाही वर्गणी घेतली जाणार नाही. प्रत्येक वारकरी स्वतःचा खर्च स्वतः करणार आहे. मुक्या जनावरांनाही पांडुरंगाचे दर्शन घडावे, या भावनेतून गोशाळेतील गाय-वासराला दिंडीत सहभागी करण्यात आले असून दिंडी सुखरूप पंढरपूरला पोहोचावी, अशीच विठ्ठलचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिला मुक्काम पाचोऱ्यात –

दिंडीचा पहिल्या दिवसाचा मुक्काम पाचोरा शहरातील विठ्ठल मंदिरात होणार असून, त्यानंतर सुमारे २० दिवसांत जवळपास ५०० किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करत आषाढी एकादशीपूर्वी दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे.

हेही वाचा: रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान; मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सहकार गौरव पुरस्कार सोहळा

बातमी शेअर करा !
Share
Tags: ashadhi ekadashi 2026ashadhi wari 2026nirlobh payi dindipachora newssatgaon dongri nirlobh payi dindisuvarna khandesh livewarkari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page