• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

व्यापाऱ्याच्या चांदी खरेदीसाठी नेण्यात येणारी रोख रक्कम हस्तगत; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 16, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव, 16 जुलै: धावत्या लक्झरी बसमधून चांदी खरेदीसाठी नेण्यात येणारी तब्बल 25 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरी करणाऱ्या चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून सोनू उर्फ राम भगवान सारवान, शेख रहेमान शेख निसार, सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे आणि दशरथ सुरेश चौधरी (चौघं रा. जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती डिझायर (एमएच-47-सी-7877) ही कार देखील जप्त करण्यात आली आहे. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

नेमकं प्रकरण काय? –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पारोळा येथील नितीन पुरुषोत्तम वाणी हे जळगावातील सराफ व्यावसायिक प्रफुल्ल भागचंद सुराणा यांच्या पेढीसाठी खासगी कुरिअरचे काम करत कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी निघाले होते. त्यांच्या ताब्यात 25 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग होती. जळगाव येथून हेरे कृष्णा ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास सुरू असताना रात्री फर्दापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील साई सुरुची लॉजिंग अँड रेस्टॉरंट येथे बस जेवणासाठी थांबली.

यावेळी नितीन वाणी जेवणासाठी खाली उतरले असता त्यांनी पैशांची बॅग बसमध्येच ठेवली होती. जेवण करून परत आल्यानंतर त्यांना बॅग जागेवर दिसून आली नाही. बस पुढील प्रवासासाठी निघून गेल्यानंतर शोध घेतला असता बॅग मिळून न आल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ताब्यात –

या गाजलेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सोनू उर्फ राम भगवान सारवान (रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी शेख रहेमान शेख निसार, सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे आणि दशरथ सुरेश चौधरी या तिघांनाही ताब्यात घेतले. चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

25 लाखांची रोकड जप्त –

तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली 25 लाख रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती डिझायर (एमएच-47-सी-7877) ही कार उपलब्ध करून दिल्याचेही तपासात समोर आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी सर्व आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

यांनी केली कारवाई –

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पो.उप.नि. दीपक जगदाळे, संतोष पवार सहा. फौज. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अक्रम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, किशोर पाटील आणि पो. अ. राहुल रगडे, प्रदिप सपकाळे, रवींद्र कापडणे, छगन तायडे सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

हेही वाचा: “हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon bus theft casejalgaon newsjalgaon policelocal crime branchsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

August 31, 2026
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 31, 2026
माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page