• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 19, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 19 ऑक्टोबर: शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत, शेतमजुरांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान, थकीत दुष्काळी निधीचे तातडीने वाटप, पीकविम्याची रक्कम मंजूर करणे आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करणे यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनानंतर तहसीलदार विजय बनसोडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. तसेच मागील काळातील थकीत दुष्काळी निधी दिवाळीपूर्वी जमा करण्याचे आश्वासन दिले.

शेतीचा वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे होणारे नुकसान, शेतकऱ्यांवरील कर्जाचा वाढता बोजा आणि शासकीय मदत मिळण्यास होणारा विलंब यांमुळे ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत आणि सरसकट कर्जमाफी द्या –

नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करावे, पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम तातडीने वितरित करावी आणि मागील काळातील थकीत दुष्काळी अनुदान विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी करण्यात आली.

शेतीतील वाढता खर्च आणि उत्पन्नातील अनिश्चितता लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

शेतमजुरांना प्रत्येकी २५ हजारांचे अनुदान द्या –

शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांनाही रोजगारातील अनिश्चितता आणि वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतमजुरांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. शेतकरी आणि शेतमजूर हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.

सातगाव डोंगरी आणि शिंदाड परिसरातील नुकसानभरपाई तातडीने द्या –

सातगाव डोंगरीसह शिंदाड परिसरातील शेतकऱ्यांच्या मागील वर्षातील नुकसानीचा प्रश्नही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही भरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने मंजूर करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा –

शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दाही आंदोलनात ठळकपणे मांडण्यात आला. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये आणि गरीब कुटुंबांवरील शैक्षणिक खर्चाचा भार कमी व्हावा, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

तहसीलदारांचे दिवाळीपूर्वी थकीत निधी जमा करण्याचे आश्वासन –

आंदोलनस्थळी तहसीलदार विजय बनसोडे यांनी भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. मागील काळातील थकीत दुष्काळी निधी दिवाळीपूर्वी तातडीने जमा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे प्रलंबित निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लागले आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक राहुल पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील उपस्थित होते. आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.

महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उद्धव मराठे, अॅड. अभय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे दिलीप खोडपे, नितीन तावडे, शेतकरी संघटनेचे शिवराम पाटील, मनसेचे ऋषिकेश भोई, शुभम पाटील, कृष्णा दुनदुले, शेख इस्माईल शेख फकीरा, शकील शेख, नंदू सोनार, बापू सोनार, मुक्तार शाह, अॅड. अंकुश कटारे, इरफान शेख, श्रावण गायकवाड, शंकर सोनवणे, शरीफ शेख, सुनील पाटील, सादिक मनियार, शशिकांत बोरसे, विनोद पाटील, अरुण तांबे, ज्ञानेश्वर चौधरी, अभिषेक खंडेलवाल, राजेंद्र राणा, रविंद्र पाटील, खंडू सोनवणे, दत्तू भोई, भागवत पाटील, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पुंडलिक पाटील, संजय धुमाळ, गंभीरराव खासेराव, वाल्मिक पाटील, परमेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, विलास गायकवाड, गोकुळ पाटील, विशाल तावडे, अनिल बोरसे, पुरुषोत्तम पाटील, किरण पाटील, बाळू पाटील, विनोद बाविस्कर, सिताराम पाटील आणि शांताराम चौधरी आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: VIDEO | शेतीत प्रयोगशीलता! ठिबक संच स्वच्छतेसाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड

बातमी शेअर करा !
Share
Tags: mahavikas aghadi protestmarathi newspachora protestsuvarana khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

October 19, 2026
जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

October 17, 2026
पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page