• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची घेतली भेट; निवेदनाची दखल घेतल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 20, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

जळगाव, 20 ऑक्टोबर: संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांमध्ये राज्य शासनाने सुधारणा केल्या आहेत. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते शांताराम उर्फ अण्णासाहेब बेलदार यांनी १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन शासनाचे आभार मानले. विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेताना लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या कागदपत्रांच्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी बेलदार यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले होते.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्ती, निराधार तसेच गरीब विधवा व परित्यक्ता महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक लाभार्थ्यांकडे जन्मदाखला किंवा शाळेचा दाखला उपलब्ध नसल्याने कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित अटींचा पुनर्विचार करून पर्यायी शासकीय पुराव्यांच्या आधारे पडताळणीची व्यवस्था करावी, अशी मागणी बेलदार यांनी निवेदनाद्वारे केली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्रव्यवहार –

बेलदार यांच्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संजय गांधी शाखेमार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. दरम्यान, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागाने विशेष सहाय्य योजनांच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला.

लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा –

शासनाने निकषांमध्ये सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर बेलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाचे आभार मानले. कागदपत्रांच्या अडचणींमुळे शासकीय सहाय्य मिळविताना अडथळे येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना या सुधारणांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. सुधारित निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon dm rohan ghugemarathi newssanjay gandhi niradhar yojanasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

October 20, 2026
ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

October 20, 2026
संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

October 20, 2026
पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

October 19, 2026
जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

October 17, 2026
पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page