• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 20, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 20 ऑक्टोबर: संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्ती, निराधार व गरीब विधवा तसेच परित्यक्ता महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक लाभार्थ्यांकडे जन्मदाखला किंवा शाळेचा दाखला उपलब्ध नसल्याने विविध कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा समोर आला होता. पात्र असूनही कागदपत्रांच्या अभावामुळे लाभ मिळवताना अडथळे येऊ नयेत, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात होती.

अशातच आता विशेष सहाय्य योजनांच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा निर्णय राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलाय. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.

शासन निर्णयात काय म्हटलंय? –

विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत राज्य शासनाने सुधारित सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, पात्र लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक असून, केवळ तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन प्रमाणपत्र सादर करणे शक्य नसलेल्या लाभार्थ्यांचेच प्रमाणपत्र ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे.

राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या राज्य पुरस्कृत योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या निकष, अटी व शर्तींमध्ये यापूर्वीही शासन निर्णयांद्वारे सुधारणा करण्यात आल्या आहेत.

डिजिटल हयात प्रमाणपत्राला प्राधान्य –

विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. यासाठी ७ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर बीएसए (Beneficiary Satyapan App) प्रणालीचा वापर करून डिजिटल हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.

नवीन सुधारणेनुसार, निर्धारित कालावधीत पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन प्रमाणपत्र सादर करणे शक्य नसलेल्या लाभार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. अशा प्रकरणांमध्येच ऑफलाइन प्रमाणपत्र स्वीकारण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

लाभार्थ्यांच्या मागण्यांनंतर निर्णय –

विशेष सहाय्य योजनांच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. या मागण्यांच्या अनुषंगाने विशेष सहाय्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. त्यानंतर लाभार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून संबंधित तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: grmaharastra governmentmarathi newssanjay gandhi niradhar yojanasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

October 20, 2026
संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

October 20, 2026
पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

October 19, 2026
जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

October 17, 2026
पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page