• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 22, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

मुंबई, 22 ऑक्टोबर: बीडमधील नारायणगडावर दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख करत गंभीर आरोप केले होते. यावर एकनाथ शिंदे यांनी पुरावे देण्याचे आव्हान दिले होते. दरम्यान, या प्रकरणी आज जालन्यात पत्रकार परिषद घेत काही कथित ऑडिओ क्लिप ऐकवत ५०० कोटी रुपयांच्या आरोपांचे पुरावे सादर केल्याचा दावा केलाय. गेल्या तीन वर्षांपासून आपल्या विरोधात राजकीय षड्यंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे यांनी ऐकवलेली ही ऑडिओ क्लिप २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका कथित ‘झूम मीटिंग’ मधील संवादाची असल्याच्या चर्चा होत आहेत. यामध्ये एका महिलेसह काही व्यक्ती मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पोहोचवल्याची आणि मराठा आंदोलन संपवण्याचा प्लॅन करत असल्याची चर्चा करताना ऐकू येत आहेत. मनोज जरांगे यांनी या क्लिपला आपला ‘पुरावा’ असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, आपल्या विरोधात काही लोकांकडून मोहीम राबवली जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी आणखी माहिती उघड करण्याचा इशाराही दिला. मराठा समाजाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ऑडिओ क्लिपमधील दावे आणि आरोपांबाबत संबंधितांची अधिकृत भूमिका तसेच स्वतंत्र पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया –

मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना सामंत म्हणाले की, या क्लिपमध्ये भाजपशी संबंधित व्यक्तींची नावे तसेच मराठा आंदोलन आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत कथित संभाषण असल्याचे दिसते. त्यामुळे क्लिपची सत्यता तपासण्यासाठी पोलिस, सायबर आणि फॉरेन्सिक यंत्रणांमार्फत चौकशी करावी. क्लिपमधील आवाज कोणाचे आहेत, ती कोणी रेकॉर्ड केली आणि अलीकडेच ती व्हायरल करण्यामागे काय कारण आहे, याचाही शोध घ्यावा. क्लिपमधील आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या प्रकरणामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, याचीही चौकशी व्हावी, असे ते म्हणाले.

उदय सामंत यांचा गैरसमज दूर करू – मंत्री आशिष शेलार

मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी मांडली आहे. मुंबईत बोलताना शेलार म्हणाले की, ही क्लिप बाहेर कशी आली, तिची सत्यता काय आहे, त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून फेरफार करण्यात आला आहे का आणि ती जरांगे यांच्यापर्यंत कशी पोहोचली, याची चौकशी होणे आवश्यक आहे. क्लिपमधील चर्चेशी भाजप सहमत नसून, त्यात भाजपच्या कोणत्याही नेत्याचा आवाज नसल्याचा दावाही त्यांनी केला. या क्लिपला पूरक पुरावा नसताना तिच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे सांगत शेलार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अमान्य असल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते असल्याचे सांगत, या प्रकरणात उदय सामंत यांचा गैरसमज झाला असल्यास तो दूर करू, असेही शेलार म्हणाले.

शिंदेंच्या शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची घेणार भेट –

मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वरिष्ठ शिष्टमंडळ आज सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या क्लिपमध्ये एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेने हे आरोप फेटाळले असून, क्लिपची सत्यता तपासून त्यामागील नेमके तथ्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा: बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: audio clipmanoj jarange patilmarathi newspress conferencesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 22, 2026
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

October 22, 2026
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

October 21, 2026
जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

October 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page