• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home एरंडोल

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

वैचारिक स्वराजाच्या ‘वेध’ वार्षिकांकाचे प्रकाशन; संत एकनाथ महाराजांचे वंशज डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांच्यासह अकरा मान्यवरांचा गौरव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 17, 2026
in एरंडोल, ताज्या बातम्या
आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

आडगाव (एरंडोल), 16 नोव्हेंबर: एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे वैचारिक स्वराज्य आयोजित ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी खान्देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘वेध’ वार्षिकांकाचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमात संतविचारांचा जागर आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडले. टाळ-मृदंगाचा गजर, संतविचार आणि भक्तिमय वातावरणामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. आडगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष बाबा भामरे होते. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते ‘वैचारिक स्वराज्य वेध वार्षिकांक २०२६-२७’चे प्रकाशन करण्यात आले. संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांची विशेष आध्यात्मिक उपस्थिती लाभली. याशिवाय गुलाबरावजी वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील आणि ॲड. विश्वासराव भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत माऊलींच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने सोहळ्याला मंगलमय सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आल्यानंतर ‘वेध’ वार्षिकांकाचे प्रकाशन झाले. संस्थेचे संस्थापक ह.भ.प. दिनेश महाराज पाटील फरकांडेकर यांनी प्रास्ताविकातून वैचारिक स्वराज्याच्या स्थापनेमागील भूमिका, संस्थेचा प्रवास, संतविचारांचा प्रसार आणि सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांची माहिती दिली. समाजातील गुणी माणसांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हाच कर्तृत्व पर्व आयोजनामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर मान्यवरांच्या मनोगतांनी कार्यक्रमाला वैचारिक उंची प्राप्त झाली. धरणगावच्या लीलाताई चौधरी यांनी महिलांनी कोणत्याही क्षेत्रात स्वतःला कमी न समजता आत्मविश्वासाने आणि निर्भीडपणे कर्तृत्व सिद्ध करावे, असे आवाहन केले. प्राचार्य सुनील पाटील यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून वैचारिक स्वराज्याची संकल्पना उलगडली. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले असले, तरी समाजात वैचारिक स्वातंत्र्य, विवेक आणि स्वतंत्र विचारांची जाणीव रुजणे आवश्यक आहे. समाजजागृती आणि प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक स्वराज्याचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांनी सामाजिक जीवनातील अनुभव मांडत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर गुलाबरावजी वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांनी सध्याच्या पुरस्कार संस्कृतीवर परखड भाष्य केले. आज अनेक ठिकाणी पुरस्कारांचा बाजार मांडला जात आहे. व्यक्तीचे चारित्र्य, कार्य आणि योगदान यांचा विचार न करता पुरस्कार दिले जातात. मात्र दिनेश महाराजांनी समाजातील खऱ्या अर्थाने कार्य करणारे दहा हिरे शोधून त्यांचा सन्मान केला. वैचारिक स्वराज्य ही माणसाच्या गुणवत्तेला किंमत देणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी वैचारिक स्वराज्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या वैचारिक स्वराज्यासारख्या संस्था प्रत्येक गावात निर्माण झाल्या पाहिजेत. अशा चळवळींना समाजाने पाठिंबा द्यावा आणि दिनेश महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांना वैचारिक स्वराज्याच्या वतीने विशेष जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर डॉ. सुभाष बाबा भामरे, अरुणभाई गुजराथी, डॉ. पुष्कर महाराज गोसावी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खान्देशातील दहा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :

१. ह.भ.प. भानुदास महाराज आडगावकर – जीवनगौरव पुरस्कार.

२. श्री. दिलीप खोडपे सर – लोकशिक्षक पुरस्कार.

३. श्रीमती लीलाताई चौधरी – खान्देशाची रणरागिणी पुरस्कार.

४. श्री. भागवत पाटील – समाजभूषण पुरस्कार.

५. श्री. भैय्यासाहेब पाटील – समाजभूषण पुरस्कार.

६. प्रा. श्री. सुनील पाटील – जीवनगौरव पुरस्कार.

७. श्री. विनायक पाटील – खान्देशचा बळीराजा पुरस्कार.

८. जिल्हा परिषद शाळा, होळ – ज्ञानदीप लावू जगी पुरस्कार.

९. श्री. संजय हिरे – शब्दसाधना पुरस्कार.

१०. श्री. अमृत देशमुख – लोकसेवक पुरस्कार.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुभाष बाबा भामरे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. आपण आजवर अनेक पुरस्कार सोहळे पाहिले; मात्र खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा हा सोहळा अप्रतिम असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक ह.भ.प. दिनेश महाराज पाटील फरकांडेकर यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र ठाकरे यांनी केले, तर ॲड. विश्वासराव भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. वारकरी परंपरेचा भक्तिमय आविष्कार, संतविचारांचा जागर आणि सामाजिक कर्तृत्वाचा गौरव अशा मंगलमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

पुरस्कार देणारे अनेक असतात; पण समाजातील खरे हिरे शोधून त्यांना सन्मानाने समाजासमोर आणण्याची भूमिका घेणारे उपक्रम विरळच असतात. वैचारिक स्वराज्याच्या ‘खान्देश कर्तृत्व पर्वा’ने हाच वेगळा आदर्श निर्माण केला. आडगावच्या भूमीत रंगलेला हा सोहळा म्हणजे केवळ पुरस्कारांचा उत्सव नव्हे, तर संतविचार, सामाजिक बांधिलकी आणि माणसाच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा खान्देशच्या वैचारिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण अध्याय ठरला.

हेही वाचा:  शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

बातमी शेअर करा !
Share
Tags: khandesh kartrutva parva 2026marathi newssuvarna khandesh livevaicharic swarajyavedh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

November 17, 2026
शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

November 16, 2026
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

November 15, 2026
कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

November 15, 2026
आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

November 14, 2026
जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

November 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page