• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 16, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

गडचिरोली, 16 नोव्हेंबर: शिक्षणाचा खरा उद्देश केवळ पदवी मिळविणे किंवा वैयक्तिक प्रगती साधणे नसून समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे हा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना मानवी संवेदना, सहानुभूती आणि नैतिक मूल्यांची जोड आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता समस्यांवर उपाय शोधू शकते; मात्र सहानुभूतीशिवाय ती निर्दयी ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी आज केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या १४ व्या दीक्षांत समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्यासह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

गडचिरोलीच्या औद्योगिक परिवर्तनात विद्यापीठाची भूमिका निर्णायक –

राज्यपाल वर्मा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात मोठे परिवर्तन घडत असून जिल्हा देशाचे स्टील हब म्हणून उदयास आला आहे. औद्योगिक विकासामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ स्थानिक युवकांना मिळण्यासाठी विद्यापीठाने कौशल्यविकास, उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांना प्राधान्य द्यावे.

गोंडवाना प्रदेशाला आदिवासी समाजाच्या स्वशासन व्यवस्थेचा समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. विशेषतः गोंड समाजाने या भागात स्वतंत्र प्रशासन आणि शासनपरंपरा विकसित केल्या होत्या. आज शिक्षण, कौशल्यविकास आणि औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून या प्रदेशाच्या विकासाला नवीन दिशा मिळत आहे.

गडचिरोली आणि चंद्रपूर या आदिवासीबहुल व दुर्गम जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने अवघ्या १५ वर्षांत शिक्षणाची उपलब्धता, परवडणारे शिक्षण आणि गुणवत्ता या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या उपक्रमांचा हजारो आदिवासी कुटुंबांना लाभ –

विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राला (एसटीआरसी) राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्टता केंद्र म्हणून मिळालेल्या मान्यतेबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत या केंद्राने ग्रामीण आणि आदिवासी भागातील उपजीविकेच्या संधी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.

गोंडवाना क्राफ्ट आणि वैद्य चिकित्सालय यांसारख्या उपक्रमांतून ३०० हून अधिक कारागिरांना सहाय्य मिळाले असून ३ हजार १०० रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. बांबू विकास, औषधी वनस्पती, मत्स्यपालन आणि इतर उपजीविकाधारित उपक्रमांमुळे ७ हजारांहून अधिक ग्रामीण व आदिवासी कुटुंबांना लाभ झाला आहे. विद्यापीठाचे हे कार्य सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक परिवर्तनाचे उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आदिवासी कल्याण, शाश्वत उपजीविका, आरोग्यसेवा, वनसंवर्धन आणि शिक्षणातील समान संधी या बाबी केवळ विद्यापीठाच्या संस्थात्मक जबाबदाऱ्या नसून नैतिक कर्तव्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणा –

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बहुविद्याशाखीय शिक्षण, अभ्यासक्रमातील लवचिकता आणि भारतीय भाषांमधून शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा, पीएम जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान यांसारख्या उपक्रमांमुळे आदिवासी समाजासाठी शैक्षणिक संधी विस्तारत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठांनी ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम प्रभावीपणे राबवून अधिकाधिक आदिवासी मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. शिक्षणाच्या संधी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कुलगुरूंनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

विकसित भारतासाठी ज्ञान, नवोपक्रम आणि सामाजिक न्याय आवश्यक –

विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट केवळ आर्थिक विकासातून साध्य होणार नाही. त्यासाठी ज्ञान, नवोपक्रम, सामाजिक न्याय, सांस्कृतिक आत्मविश्वास आणि जबाबदार नागरिकत्व आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

अभियंत्यांनी लोकांचे जीवन सुलभ करणारे तंत्रज्ञान विकसित करावे, डॉक्टरांनी आरोग्यसेवेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता सेवाभावाने कार्य करावे, वैज्ञानिकांनी मानवकल्याणासाठी संशोधन करावे आणि उद्योजकांनी संपत्तीबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

यशाच्या प्रवासात अपयश आले तरी खचून न जाता सातत्याने नवे प्रयोग करावेत. आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि समाजाचे योगदान कधीही विसरू नये, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

संविधानात्मक मूल्यांचे जतन आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणातून सक्षम पिढी घडवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवरील नागरिकांचा विश्वास कायम राहणे लोकशाहीच्या बळकटीसाठी अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला ‘ग्रामर ऑफ अनार्की’ अर्थात ‘अराजकतेचे व्याकरण’ हा विचार प्रत्येक विद्यापीठात शिकवला गेला पाहिजे. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत असून या बदलांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठांनी कौशल्याधारित व उद्योगाभिमुख शिक्षणातून सक्षम मनुष्यबळ घडवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

गडचिरोलीतील औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. विद्यापीठाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे काम लवकर सुरू करून त्याचे भूमिपूजन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शैक्षणिक गुणवत्तेत मुलींचे प्रमाण ५५ ते ७५ टक्क्यांपर्यंत असल्याबद्दल मुलींचे कौतुक करताना मुलांनीही गुणवत्तेत पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

२४.१५ कोटींच्या पायाभूत सुविधांचे उद्घाटन –

गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या सहकार्यातून अडपपल्ली येथे विकसित करण्यात आलेल्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या टप्प्यातील २४ कोटी १५ लाख रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधांचे मान्यवरांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि उद्योगाभिमुख कौशल्यविकासाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.

‘मानवमुक्तीचा दीपस्तंभ’ गौरवग्रंथाचे प्रकाशन –

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानावर आधारित ‘मानवमुक्तीचा दीपस्तंभ’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

सुवर्णपदक विजेते आणि आचार्य पदवीधारकांचा गौरव –

दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांतील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच ४२ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा आणि १५० आचार्य पदवीधारकांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी राज्यपालांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. गडचिरोली आणि गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत राष्ट्रसेवेत योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

बातमी शेअर करा !
Share
Tags: artificial intelligencegovernor jishnu dev varmahuman sensibilitiesmarathi newssocial changesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

November 16, 2026
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

November 15, 2026
कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

November 15, 2026
आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

November 14, 2026
जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

November 14, 2026
समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

November 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page