• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 27, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

पाचोरा, 27 नोव्हेंबर: भारतीय संविधान हे केवळ एका जाती-धर्माचे किंवा विशिष्ट समाजाचे नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणारा आधार आहे. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणाची आणि त्यातील मूल्यांच्या प्रसाराची जबाबदारीही सर्व समाजघटकांची आहे. संविधानाबाबतची जागरूकता काही समाजांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक कुटुंबापर्यंत, तरुणांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संविधान जागृती अभियानाचे राष्ट्रीय प्रचारक निखिल रांजणकर यांनी केले. संविधान दिनानिमित्त गुरुवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पाचोरा शहरातील हुतात्मा स्मारकावर आयोजित ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये ते बोलत होते.

‘समाजाने जागरूक राहून सक्रिय सहभाग नोंदवावा’ –

संविधानाविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, शाळा-महाविद्यालयांत आणि सामाजिक माध्यमांवर चर्चा घडवून आणावी, असे आवाहन रांजणकर यांनी केले. संविधान धोक्यात असल्याची चर्चा करताना केवळ संविधानाच्या पुस्तकाचा विचार न करता, त्यातून मिळालेले नागरिकांचे अधिकार आणि संरक्षण यांचा विचार करणे आवश्यक आहे. हे अधिकार टिकविण्यासाठी समाजाने जागरूक राहून सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय संतपरंपरा आणि महापुरुषांच्या विचारांमध्येही समता, बंधुता आणि सर्वकल्याणाची मूल्ये दिसून येतात. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रोहिदास, संत तुकडोजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी ही मूल्ये भारतीय समाजाच्या विचारपरंपरेशी जोडलेली असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागडे शिक्षण, महिलांची समानता आणि वंचित घटकांचे अधिकार यांसारख्या विषयांकडेही संवैधानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संविधान जागृतीच्या चळवळीत युवक आणि महिलांचा सहभाग वाढविण्याबरोबरच नव्या पिढीला समजेल अशा पद्धतीने विचार मांडण्याचे आवाहनही निखिल रांजणकर यांनी केले.

संविधानामुळेच सर्वसामान्य माणसाला नेतृत्वाची संधी – गणेश पाटील

संविधानामुळेच सर्वसामान्य माणसाला लोकशाही व्यवस्थेत नेतृत्वाची संधी मिळते. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एकसंध ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम संविधानाने केले आहे. त्यामुळे संविधानाचे महत्त्व समजून घेण्यासाठी नागरिकांनी केवळ समाजमाध्यमांवर व्यक्त न होता अशा वैचारिक कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हावे. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर अंकुश ठेवण्याचे काम संविधान करते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नगरसेवक गणेश पाटील यांनी केले.

युवकांमध्ये नवी वैचारिक जाणीव निर्माण करण्याची गरज – संजय वाघ

अध्यक्षीय भाषणात पाटीसीचे चेअरमन संजय वाघ यांनी सामाजिक संस्था, चळवळी आणि संघटनांमध्ये काम करणारे जागरूक कार्यकर्ते उपस्थित असल्याचे महत्त्व अधोरेखित केले. या संवादातून मिळालेले विचार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. बदलत्या सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक परिस्थितीत जागरूक राहून युवकांमध्ये नवी वैचारिक जाणीव निर्माण करण्याची गरजही त्यांनी मांडली.

विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक गणपत धुमाळ यांनी संविधानाचा सन्मान हा भारतीय समाजातील शोषणमुक्तीच्या दीर्घ लढ्याचा सन्मान असल्याचे सांगितले. संविधानाला केवळ एका समाजाशी जोडून पाहणे योग्य नाही. विविध समाजघटकांनी आणि चळवळींनी केलेल्या संघर्षांचे प्रतिबिंब संविधानात उमटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून या संघर्षांना घटनात्मक स्वरूप देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या ज्ञानालाही शैक्षणिक व्यासपीठांवर योग्य स्थान मिळाले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

इक्रा एज्युकेशन सोसायटीचे अब्दुल करीम सालार यांनी निखिल रांजणकर यांच्या संविधान जागृतीच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना संविधान, त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये छोटी पुस्तिका वितरित करण्याची सूचना त्यांनी केली. या उपक्रमात मुली आणि महिलांचाही सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.

संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविक करताना खलील देशमुख यांनी सांगितले की, संविधानाची ७५ वर्षे पूर्ण होत असताना तरुण पिढीला संविधानाचे महत्त्व, त्यामागील इतिहास आणि संविधानिक मूल्यांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील विचारवंतांनी संविधान जनजागृती अभियान सुरू केले. या अभियानातून इंजिनिअर, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रांतील तरुण कार्यकर्ते संविधानाच्या अभ्यासासाठी एकत्र आले असून, महाराष्ट्रभर संविधान प्रबोधनाचे कार्य सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातही या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून, शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद, प्रश्नोत्तरे आणि संविधानविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. संविधानाच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व समाजघटकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगत देशमुख यांनी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनीही संविधान जनजागृतीची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. संविधानाच्या अभ्यासासाठी तरुणांनी पुढे येणे ही काळाची गरज असून, संविधानिक मूल्यांचा प्रसार समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प खलील देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला परशुराम कलामंचाच्यावतीने पोवाडा गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय वाघ यांनी तर आभार प्रदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा: मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsnikhil ranjankarpachora newssamvidhan samman jagar samvadsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

November 27, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

November 27, 2026
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

November 26, 2026
पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

November 26, 2026
जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

November 26, 2026
विकास सर्वसमावेशक असावा; शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविणे आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकास सर्वसमावेशक असावा; शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविणे आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

November 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page