• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ई-हक्क प्रणालीद्वारे तलाठ्यांकडील चकरा टळणार; नेमकी कशी असेल प्रक्रिया?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 29, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
File Photo

File Photo

जळगाव, 28 सप्टेंबर : सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसारख्या कामांसाठी आपल्याला तलाठ्याकडे जावे लागते. वेळेप्रसंगी पुन्हा पुन्हा जाऊनही तलाठ्याकडील कामे होत नाही. मात्र, ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांच्या तलाठ्यांकडील चकरा टळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात याबाबतची प्रक्रिया नेमकी कशी असेल.

ई-हक्क प्रणाली –
सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसारख्या यांसह इतर महत्त्वाच्या कामांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी जमाबंदी आयुक्तालयाने ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर दाखल अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येतील आणि त्या त्रुटींची पूर्तताही तेथेच करता येईल.

ऑनलाईन प्रक्रिया –
सध्या फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. परंतु आता तलाठ्याकडे न जाता अर्ज दाखल करण्यासाठी ई- हक्क ही नवीन ऑनलाईन आज्ञावली (PDE Public Data Entry) वापर करता येणार आहे.

असा करा अर्ज –

  • अर्जदार संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतो आणि तलाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया करू शकतात.
  • वारसाची नोंद करण्यासाठी किंवा मयताचे नाव कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही.
  • संकेतस्थळाला भेट देऊन तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून फेरफार अर्जाची माहिती भरल्यानंतर हा अर्ज तलाठ्याच्या लॉगिनमध्ये दिसणार.
  • संबंधित अर्ज मंजूर करून तलाठी फेरफार नोंद करणार.

एसएमएसद्वारे मिळणार माहिती –
एखाद्या अर्जदाराने फेरफारसाठी अर्ज दाखल केला आणि तो स्वीकृत झाला तर त्याचा एसएमएस अर्जदाराला येणार. त्यामध्ये फेरफारचा क्रमांक नमूद असेल. जर अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर त्रुटी पूर्ततेसाठी अर्ज परत केल्याची माहिती एसएमएसद्वारे अर्जदाराने मिळेल.
त्यामुळे हे संकेतस्थळ नुसतेच अर्ज दाखल करण्याचे माध्यम नसून यामध्ये अर्जाची प्रगती एसएमएसद्वारे मिळणार आहे. राज्य सरकारने अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सातबाऱ्यावरती दुरुस्त्या करायचे आहेत, त्यांनी वापरावी.

नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाईन –
यामध्ये वारसाची नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब कर्त्याची नोंद कमी करणे व सातबारा उताऱ्यावरील चुका दुरुस्त करणे या सहा प्रकारच्या नोंदीमध्ये दुरूस्ती सर्वसामान्य नागरिक ऑनलाईन करून शकतो किंवा आपले सरकार व ई-सेवा केंद्राची मदत घेऊ शकतो. ई-करार नोंदणी करणे, कर्जाचा बोजा चढविणे व कर्जाचा बोजा कमी करणे या तीन प्रकारच्या नोंदीमध्ये बँकांना बदल करता येणार आहे.

ऑनलाईन शुल्क –
नऊ प्रकारच्या फेरफार अर्जांची कार्यवाही जळगाव जिल्ह्यात ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असून यासाठी अर्जदार किंवा खातेदाराला ई-हक्क प्रणालीतून ऑनलाईन पध्दतीने आपले सरकार किंवा ई-सेवा केंद्रावरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रति अर्ज ५० रूपये फी निश्‍चित करण्यात आली आहे. जास्तीची फी आकारणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: e hakke hakk systempublic data entry

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page