नाशिक (प्रतिनिधी), 4 नोव्हेंबर : नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सभा नुकतीच पार पडली. नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य विभागीय शिक्षण मंडळ नाशिक येथे ही सभा पार पडली.
या सभेचे प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी केले. सहविचार सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने मुख्याध्यापक यांची एकदिवशीय कार्यशाळा (उद्बोधन शिबीर) नोव्हेंबर २८/२९ रोजी आयोजित करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.
या महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा –
- शाळेच्या प्रलंबित संच मान्यता देणे आणि त्यातील त्रुटी दूर करणे,
- डीएड टू बीएड प्रमोशन तातडीने देणे,
- मुख्याध्यापक यांना सह्याचे अधिकार न देता कायम स्वरूपी मान्यता देणे, यासाठी DCPC कोर्सची अट शिथील करणे,
- पे युनिटशी संबंधीत १३६ कोटीची प्रलंबीत फरक बिले, मेडीकल बिले, रजा रोखीकरण बिले इ. पुरवणी बिलांसाठी शिक्षण
- आयुक्तांकडे निधीची मागणी करुन मंजूर करणे
- पे युनिटच्या कामकाजाकडे खास लक्ष देणे,
- सेवा ज्येष्टता यादी, संस्था अंतर्गत वाद व कर्मचारी वाद असेल तेथील कर्मचाऱ्यांचे प्रश्न शिक्षण विभागाने तत्काळ निकाली काढणे,
- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी, लेखाशिर्ष TSP -1901 या हेडखाली येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करणे,
- दिपावली सुट्टी यामध्ये माध्यमिक व प्राथमिक यांच्यात समानता आणणे,
- ०१ डिसेंबर २०२२ रोजीचा विनाअनुदानित वरून अनुदानित बदली न देणे बाबदचा शासन निर्णय रद्द करणे . ०१ ऑगस्ट २०२२ लिपीक व प्रयोगशाळा सहाय्यक यांना भरती व मान्यता यावर आणलेली स्थगिती त्वरित उठवणे, या विषयांवर वादळी चर्चा झाली.
यांची होती उपस्थिती –
यावेळी मुख्याधापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत, सचिव एस बी देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप सांगळे, बी के नागरे, दिपक व्याळीज, के डी देवढे, बी डी गांगुर्डे, अनिल माळी, भागीनाथ घोटेकर, बी के शेवाळे, डी बी गांगुर्डे, डी एस ठाकरे, शरद लोंढे, पोपट जाधव, ए एम अहिरराव, डी जी रणधीर, बी बी गांगुर्डे, आर टी जाधव, सुरेश घरटे, सुनिल फरस, प्रशांत पवार, आर बी एरंडे, अजित लाठार इ. मुख्याध्यापक उपस्थित होते.