जळगाव (मुंबई), 10 नोव्हेंबर : राज्य सरकारद्वारे गेल्या आठवड्यात 40 चालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता 178 तालुक्यांमधील 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मदत व पुनर्वसनविषयक उपसमितीने गुरूवारी (9 नोव्हेंबर) हा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील एकूण 218 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी महत्वाची माहिती –
जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 महसूली मंडळामध्ये देखील दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली. तसेच जळगाव जिल्ह्यात 2019 मध्ये भडगाव, रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यात शेत पिकांच्या नुकसान झाले होते. यामुळे या शेत पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्याचा निर्णयही मंत्रालयातील बैठकीत काल घेण्यात आला.
दरम्यान, दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केल्यानंतर 959 महसुली मंडळांमध्ये या सवलती देण्यात येणार असल्याची माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
महसुल मंडळ म्हणजे काय? –
महसूल रचनेतील गाव लहान घटक आहे. काही गावांचा मिळून सज्जा बनतो. काही सज्जांचा मिळून मंडळ (सर्कल) तयार होते. अनेक मंडळांचा एक तालुका होतो. मंडळ अधिकार त्याचा प्रमुख असतो. प्रत्येक महसूल मंडळात एक पर्जन्यमापक उपकरण आहे. त्यामुळे पावसाचा खंड मोजण्याचे एकक महसूल मंडळ आहे. त्यामुळे टंचाई स्थिती महसूल मंडळानुसार जाहीर केली जाते.