चाळीसगाव, 20 जानेवारी : चाळीसगाव येथे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील तसेच त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्यातर्फे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, आज या शिवमहापुराण कथेचा शेवटचा दिवस होता. यानिमित्ताने कथास्थळी राजकीय नेत्यांनी देखील उपस्थिती लावली.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? –
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आज शिवमहापुराण कथेत उपस्थित होते. बावकुळे यांनी कथेच्या शेवटी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार उन्मेश पाटील यांनी केलेल्या कथेच्या आयोजनाबद्दल कौतुक करत त्यांच्या खासदारकीच्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली.
खासदार उन्मेश पाटील यांची केली प्रशंसा –
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मागील काही दिवसांपुर्वी खासदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणारा जो सर्व्हे समोर आला होता, त्या सर्व्हेत खासदार उन्मेश पाटील हे पहिल्या टॉप-10 खासदारांच्या यादीत होते, ही बाब आमच्यासाठी अभिनंदनीय आहे.
ते पुढे म्हणाले की, उन्मेश पाटील हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातून सर्वात जास्त मतांनी जिंकून आलेले खासदार आहेत. उन्मेश पाटील हे एकमात्र खासदार असे आहेत ज्यांनी 450 किमीची गिरणा नदीची परिक्रमा पूर्ण केली आहे. याबद्दलही त्यांनी कौतुक केले.
हेही वाचा : सोलपूर येथील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक, क्षणभर भाषण थांबवलं अन्…