• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 14, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

जळगाव, 14 फेब्रुवारी : जळगाव जिल्हा परिषद येथे UNICEF टीमसोबत बालसंरक्षण, लिंगसंवेदनशीलता व डिजिटल सुरक्षितता या विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखालील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO), Maharashtra State Commission for Protection of Child Rights (MSPCR) चे प्रतिनिधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत मानसोपचार तज्ञ तसेच खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत मुलांमध्ये लहान वयापासून योग्य मूल्यसंस्कार रुजविणे आणि डिजिटल युगातील वाढत्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी शालेय व अंगणवाडी स्तरावर प्रभावी मॉड्यूल्स विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

बैठकीतील मुख्य निष्कर्ष –

  1. लहान मुलांमध्ये (विशेषतः मुलांमध्ये) स्त्री संमती, स्त्री शरीराविषयी आदर व लिंगसमतेबाबत संवेदनशीलता विकसित करणे.
  2. लहान मुलींमध्ये अश्लील सामग्री, सोशल मीडियाद्वारे होणारा लैंगिक डिजिटल संपर्क किंवा एक्स्पोजर याबाबत योग्य वयात योग्य पद्धतीने जागरूकता निर्माण करणे.

तीन स्वतंत्र मॉड्यूल्स तयार करण्याचा निर्णय –

१) पहिले मॉड्यूल – UNICEF मार्फत ५ ते १० स्पष्ट, वस्तुनिष्ठ व नैतिक मुद्द्यांचा समावेश असलेले मार्गदर्शक मॉड्यूल तयार करण्यात येईल. या मॉड्यूलच्या आधारे शिक्षक व अंगणवाडी सेविका विद्यार्थ्यांना नियोजित पद्धतीने प्रशिक्षण देतील.

 

२) दुसरे मॉड्यूल – मानसोपचार तज्ञांमार्फत एक शासकीय व एक खाजगी मानसोपचार तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली बाल मानसशास्त्रावर आधारित ‘हँडी रूलबुक’ स्वरूपातील मॉड्यूल तयार करण्यात येईल. यामुळे अंगणवाडी सेविका व शिक्षकांना मुलांमधील मानस-सामाजिक (Psychosocial) अडचणी किंवा विकार लवकर ओळखणे सुलभ होईल.

 

३) तिसरे मॉड्यूल – पालक शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सक्रिय करून ‘पालक शाळा’ संकल्पनेअंतर्गत पालकांना मार्गदर्शन केले जाईल. विशेषतः मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत काय योग्य व काय अयोग्य, यासंदर्भात पालकांना सजग व जबाबदार बनविण्यावर भर दिला जाईल.

अंमलबजावणीची रूपरेषा –

तिन्ही मॉड्यूल्स तयार झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी पुढील दोन स्तरांवर करण्यात येईल –

  1. मुख्याध्यापक (HM) स्तरावर SMC च्या माध्यमातून निवडलेल्या ५–१० मुद्द्यांवर नियोजित व पुनरावृत्ती स्वरूपात चर्चा व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन.
  2. शाळा स्तरावर ‘बालसुरक्षा समिती’ची स्थापना/संस्थात्मक रचना करणे. या समितीत बीट आमलदार, अंगणवाडी सेविका व शिक्षकांचा समावेश राहील.

बैठकीत संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून ठरविण्यात आलेल्या मॉड्यूल्सची लवकरात लवकर तयारी व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. बालकांच्या सर्वांगीण, सुरक्षित आणि सुदृढ विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असून जिल्हा परिषद प्रशासन यासाठी कटिबद्ध आहे.

हेही वाचा : आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

बातमी शेअर करा !
Share
Tags: child protectiongender sensitivityias minal karanwaljalgaon newsjalgaon zpsuvarna khandesh liveUNICEFzp ceo

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page