ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव (हरे.) पाचोरा, 26 जानेवारी : माजी विद्यार्थी संघ संचलित मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव (हरे) विद्यालयात येथे आज, 26 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी 75 वा प्रजासत्ताक दिना साजरा करण्यात आला. त्या निमित्त मा. प्रा. डॉ. पंकज शिंदे अध्यक्ष- रोटरी क्लब पाचोरा- भडगाव, यांच्या हस्ते ध्वजारोहण साजरा करण्यात आले.
यावेळी डॉ. मुकेश तेली सेक्रेटरी, रोटरी क्लब पाचोरा -भडगाव, आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष तथा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मा. पी. बी. पाटील साहेब, संस्थेचे सहसचिव संजय पाटील सर, संचालक एस. एस. पाटील सर, दिलीप विजयसिंह देशमुख सर, शिवानंद तुकाराम पाटील, माजी सैनिक – भगवान पाटील, गोविंद मंदिर संस्थांचे अध्यक्ष शामराव महाजन , पत्रकार – राजू ठाकूर, ग्रामस्थ- ईश्वर रघुनाथ पाटील, रमेश दौलतराव चौधरी, विठ्ठल नारायण गीते, विठ्ठल रामदास गीते, दौलत गीते साहेब, वसंत उखर्डू माळी, रवी गीते, देविदास सांडू पाटील, रमेश रामदास उबाळे, भाजप युवा नेते विनोद महाजन, तसेच महिला कोकिळा पाटील, नंदा पाटील, वंदना पाटील, स्वाती पाटील, सुनिता घोंगडे, प्रमिला गायकवाड, कमलबाई पाटील, कल्पना गीते, प्रतिभा गीते, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विश्वनाथ चौधरी, सुरेंद्र देशमुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.
आज विशेष म्हणजे कडाक्याची थंडी असतानाही आमच्या.. कर्ण बधीर विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्त पद्धतीने कवायत सादर केली. कवायतीचे सूत्रसंचालन अधीक्षक नितीन पाटील यांनी केले. कवायत खूप छान केली याबद्दल सर्वच पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. डॉक्टर मुकेश तेली यांनी विद्यार्थ्यांना थंडी असल्याकारणाने लवकरात लवकर स्वेटर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. प्राध्यापक दिलीप देशमुख सर व मुंबई येथील त्यांचा मित्रपरिवार यांनी विद्यालयास पंधरा खुर्च्या देण्याचे आश्वासन दिले. सदर सदर प्रसंगी नारायण भावजी महाजन व विठ्ठल रामदास गीते यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. सदर राष्ट्रीय कार्यक्रमास मान्यवरांचे व दानशूरांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन गोविंद महाजन यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी ते करिता विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी परिश्रम घेतले.
हेही वाचा : बालिका अत्याचार प्रकरण, अमळनेर सत्र न्यायालयाने अवघ्या 5 महिन्यातच दिला ‘हा’ महत्त्वाचा निकाल