संदिप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 11 मार्च : पाळधी ते तरसोद बायपाससह या मार्गावरील अनेक भागांचे काम बाकी असतांना हा पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या टोलनाक्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. नवीन टोल नाका उभारण्यात आलेला आहे.
पाळधी ते तरसोद बायपाससह या मार्गावरील अनेक भागांचे काम बाकी असतांना हा टोल नाका सुरू करणे चुकीचे आहे. त्यामुळे सर्व कामे पूर्ण झाल्यावर 20 किलोमीटर अंतरातील सर्व स्थानिकांच्या वाहनांसाठी 20 रूपये प्रति फेरी या प्रमाणे टोल आकारणी करावी, अशी मागणी व्यापारी महासंघ, शरद पवार गटातील पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार उल्हास देवरे, पोलिस निरीक्षक सुनील पवार यांना देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, रोहन पवार, तुषार पाटील, दीपक अनुष्ठान, डॉ. शांताराम पाटील, महेश पाटील यांच्यासह राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग 53 वर सबगव्हाण गावाजवळ आज पासून सुरू होणाऱ्या टोलनाक्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांनी एकजूट दाखवत प्रशासनास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.
हेही वाचा : मोठी बातमी! पारोळा तालुक्यातील टोलनाक्याची तोडफोड करत अज्ञातांनी कॅबिन पेटवली, नेमकं काय प्रकरण?






