धुळे, 18 मार्च : समता शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव निमित्त समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथे 18 मार्च रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विवेक माधवराव वाघ (सदस्य समता शिक्षण संस्था, पुणे) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून न्या. संदीप स्वामी ( सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे ) निशांत सारवरकर ( वरिष्ठ सहाय्यक उपसंपादक लोकसत्ता पेपर मुंबई ) इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक बक्षीस समारंभ कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य, मा. डॉ. विष्णू गुंजाळ यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर केली. तसेच अहवाल वाचन प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे यांनी केले. क्रीडा विभागाचे शिक्षक प्रा. डॉ. संजीव पगारे यांनी क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व खेळात दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांना औषधे उपचार देखील करून दिला होता.
वर्षभरात महाविद्यालयात झालेल्या विविध कार्यक्रम व स्पर्धा मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना गुणगौराव पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच सगळ्यात जास्त कार्यक्रम, क्रीडा स्पर्धात, क्रिकेट, खो खो, कब्बडी, व्हॅलीबल, भाला फेक, थाळी फेक, गोडा फेक, काव्य वाचन, गायन, पोस्टर, फेन्सी ड्रेस, एकपात्री नाटक, इत्यादी स्पर्धा मध्ये एम. एस. डब्ल्यू. प्रथम व द्वितीय वर्ष, आणि बी. एस. डब्ल्यू. प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्यात सगळ्यात जास्त विविध कला प्रकारात एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्त बक्षीस मिळवले आहे. त्यामुळे एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष या वर्गाला सर्वांत्कृष्ट वर्ग प्राप्त पुरस्कार म्हणून सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार देण्यात आले आहेत. अशा प्रकारे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विष्णू गुंजाळ, विवेक वाघ (सदस्य समता शिक्षण संस्था, पुणे), निशांत सारवरकर (वरिष्ठ सहाय्यक उपसंपादक लोकसत्ता मुबंई), न्या. संदीप स्वामी ( प्रा. डॉ. राहुल आहेर, प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे, प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. संजीव पगारे, प्रा. डॉ. दिलीप घोंगडे, प्रा. मेघावी मेश्राम, प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे, प्रा. डॉ. प्रीती वाहाने, प्रा. डॉ. फरीदा खान व महाविद्यालयातील इतर शिक्षक व कर्मचारी, तसेच एम. एस. डब्ल्यू. प्रथम, द्वितीय, वर्ष व बी. एस. डब्ल्यू. प्रथम, द्वितीय, तृतीय, वर्षातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मेघावी मेश्राम यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. दिलीप घोंगडे यांनी मानले.
हेही वाचा : Breaking : नंदुरबार जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, आमदार आमश्या पाडवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश