ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 मार्च : पाचोरा शहरातील अस्सुफा इंटरनॅशनल स्कूल येथे शाळेतील रोजा (उपास) ठेवणाऱ्या 40 विद्यार्थ्यांसाठी पवित्र रमजान महिना सुरू असल्याने दावते इफ्तार कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले. दावते इफ्तार कार्यक्रमात तहान-भूक सहन करून उपास ठेवणारे विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
लहान मुलांना प्रोत्साहना देऊन नैतिक शिक्षण देणे व भविष्यात समाज व देशासाठी चांगला शहरी तयार करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून संस्थाचालक हाजी मुस्लिम बागवान, केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर, शेख जावेद रहीम, पदवीधर शिक्षक रेहान खान उपस्थित होते.
यावेळी शाफियोद्दिन ठेकेदार, रज्जू बागवान, हारून बागवान, जाकीर अलाउद्दीन, अकरम कुरैशी, आकिब सर, सईद शब्बीर, तारिक सय्यद, मुख्याध्यापक अब्दुल एजाज, सलाउद्दीन शेख आदी मान्यवरांसह पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी शाळा कॉर्डिनेटर डॉक्टर मूसेफ, मुख्याध्यापक फहीम कुरेशी, निकहत शेख, सना खान, रिफत देशमुख, फरजाना शेख, शेख साहेब यांनी परिश्रम घेतले. डॉक्टर मुसेफ यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.






