जळगाव, 20 मार्च : राज्यात लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अंकित यांची बदली करण्यात आली असून त्यांची जागी सनदी अधिकारी शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अंकित यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुभम गुप्ता हे 2019 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत (UPSC) ते देशात 6 व्या रँकने उत्तीर्ण झाले होते.
अवघ्या 9 महिन्यातच बदली –
राज्यातील 14 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काल काढण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 9 महिन्यांच्या कालावधीतच त्यांची बदल करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची बदली करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
हेही वाचा : मोठी बातमी, जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू; काय आहे नियमावली?