• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाणून घ्या ठळक मुद्दे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 5, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाणून घ्या ठळक मुद्दे

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली, 5 एप्रिल : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षातील नेत्यांकडून विकास, योजना, कार्यकाळ याबद्दल टीका-टिप्पणी केली जात आहे. दरम्यान, आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा GYAN ‘ग्यान’ या संकल्पनेवर आधारित –
काँग्रेसने आज या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते. काँग्रेसचा हा जाहीरनामा GYAN ‘ग्यान’ या संकल्पनेवर आधारित असून ती संकल्पना म्हणजे गरीब, वाय म्हणजे यूथ, ए म्हणजे अन्नदाता तर एन म्हणजे नारी अशी होय. देशातील या घटकांना केंद्रस्थानी ठेवत काँग्रेसकडून त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील पाच न्याय –
काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पाच महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. त्यात युवा न्याय, महिला न्याय, समता न्याय, शेतकरी न्याय आणि कामगार न्याय यांचा उल्लेख आहे. आम्ही अन्यायाच्या या भयानक काळातील अंधार दूर करू आणि भारतातील लोकांसाठी समृद्ध, न्यायाने परिपूर्ण असा ‘सुसंवादी भविष्याचा मार्ग’ तयार करु, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात 25 गॅरंटी –
भाजप प्रचार करत असताना मोदी की गॅरंटी देत असून काँग्रेसने देखील या जाहीरनाम्यामध्ये 25 गॅरंटी दिल्या आहेत. शेतकरी, मजूर, युवा, रोजगाराच्या संधी, महिला विकास याविषयीची काही आश्वासने काँग्रेसने दिली आहेत. काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे –

  • 30 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन
  • पहिल्या पक्क्या नोकरीचे वचन
  • युवा स्टार्टअप फंड – 5000 कोटी
  •  बेरोजगार भत्त्यासारख्या योजनांमध्ये चांगले पैसे थेट खात्यात देणार
  •  शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात सवलत
  • रिक्त पदांची भरती करणार
  • बस प्रवासात सवलत
  • अग्निवीर योजना बंद करून जुनी भरती योजना सुरू करणार
  • गृहलक्ष्मीसारख्या योजनेपेक्षा अधिक पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा करणार
  • 450 रुपयांना गॅस सिलिंडर देणार
  • पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार
  • शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीऐवजी एमएसपी हमी
  • शेतकऱ्यांच्या उपकरणांवरील जीएसटीमध्ये बदल
  • महागाईपासून सुटका करण्यासाठी उपाययोजना
  • पेपरफुटी थांबवण्यासाठी कठोर शिक्षा आणि वेगळी रणनीती
  • न्याय योजनेच्या धर्तीवर (गरीब कुटुंबांना प्रतिवर्षी 72 हजार रुपये), गरीब मजुरांसाठी चांगली योजना
  • मनरेगाचा अभ्यास करुन पुन्हा योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याचे आश्वासन
  • जात जनगणना आणि त्यांच्या संख्येवर आधारित आरक्षणाचे आश्वासन.
  • आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा हटवणार
  • लघुउद्योजकांचे कर्ज काही प्रमाणात माफ करून त्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज
  • देशभरात आठ कोटी हमी कार्ड वितरित करण्यासाठी 3 एप्रिलपासून घरोघरी जावून हमी अभियान सुरू करणार
  • रेल्वे भाडे कमी करण्याचे आश्वासन, वृद्धांना सवलत काढून घेणे, डायनॅमिक फेअर सारख्या योजना बंद करणे
  • रेल्वेचे खाजगीकरण न करण्याचे आश्वासन

हेही वाचा : भाड्याच्या घरात राहिला अन् मेहनतीने वयाच्या 24 व्या वर्षीच बनला तलाठी; नगरदेवळ्याच्या लक्ष्मणची प्रेरणादायी कहाणी

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावच्या पिलखोडचे जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत ₹60 लाखांची मदत; पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान

चाळीसगावच्या पिलखोडचे जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत ₹60 लाखांची मदत; पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान

April 10, 2026
खरीप हंगाम 2026 नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक; शेतकऱ्यांना पुरेशा खत पुरवठ्याचा आढावा

खरीप हंगाम 2026 नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक; शेतकऱ्यांना पुरेशा खत पुरवठ्याचा आढावा

April 10, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी विभागांना दिल्या भेटी

जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी विभागांना दिल्या भेटी

April 10, 2026
खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

April 8, 2026
नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

April 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page