• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

भाड्याच्या घरात राहिला अन् मेहनतीने वयाच्या 24 व्या वर्षीच बनला तलाठी; नगरदेवळ्याच्या लक्ष्मणची प्रेरणादायी कहाणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 5, 2024
in पाचोरा, करिअर, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धुळे
भाड्याच्या घरात राहिला अन् मेहनतीने वयाच्या 24 व्या वर्षीच बनला तलाठी; नगरदेवळ्याच्या लक्ष्मणची प्रेरणादायी कहाणी

इंद्रनील भामरे-पाटील, प्रतिनिधी
नगरदेवळा (पाचोरा), 5 एप्रिल : कठोर मेहनत, आर्थिक परिस्थितीसोबत जुळवून घेत प्रयत्नामध्ये सातत्य ठेवत संघर्ष करण्याची तयारी असल्यास निश्चित ध्येयाची प्राप्ती होते. याचेच एक उदाहरण म्हणजे लक्ष्मण महाजन या तरूणाची प्रेरणादायी स्टोरी. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील लक्ष्मण नामदेव महाजन या युवकाची वयाच्या 24 वर्षी धुळे जिल्ह्यात तलाठी पदासाठी निवड झाली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
मागील वर्षी जून 2023 मध्ये तलाठी पदासाठी निघालेल्या भरती प्रक्रियेसाठी निवड प्रक्रिया पार पडली आणि नुकताच तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, लक्ष्मण महाजन या युवकाची धुळे जिल्ह्यासाठी तलाठीपदी निवड झाली आहे. लक्ष्मणने सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत संवाद साधत त्याच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती दिली.

‘अशी’ झाली तलाठीपदी निवड –
तलाठीसाठी भरती प्रक्रिया पार पडत असताना राज्यभरातून साडे नऊ लाख अर्ज भरण्यात आले. तसेच धुळे जिल्ह्यासाठी 27 हजार 657 अर्ज प्राप्त झाले होते. दरम्यान, धुळे जिल्ह्यात तलाठी पदासाठी 8 इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) जागांसाठी 9500 अर्ज आले. दरम्यान, लक्ष्मणने सेल्फ स्टडी आणि मेहनतीच्या बळावर 193.62 गुण मिळवत तलाठी पदाला गवसणी घातली. लक्ष्मणने धुळे जिल्ह्यासाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (सर्वसामान्य) पहिली रँक प्राप्त केली.

स्पर्धा परिक्षेच्या तयारी सुरूवात –
लक्ष्मणने नगरदेवळा येथील सरदार एस.के. पवार शिक्षण संस्थेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. तसेच त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून 2021 साली अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण पुर्ण केले. लक्ष्मणची कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून ते नगरदेवळा येथे भाड्याच्या घरात राहतात. दरम्यान, पदवीचे शिक्षण पुर्ण करत असताना 2019 सालापासून लक्ष्मणने सेल्फ स्टडीच्या माध्यमातून राज्यसेवेच्या परिक्षेसाठी तयारी सुरू केली.

लक्ष्मणचे मामा धुळे जिल्ह्यात सध्या मंडल अधिकारी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. लक्ष्मण हा आतापर्यंत राज्यसेवेच्या वर्ग -2 आणि वर्ग -3 च्या अनेक मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरला होता. दरम्यान, त्याची आता सरळसेवेच्या माध्यमातून तलाठी पदासाठी निवड झाली आहे. तसेच आता तो धुळ्यात वकिलीचे शिक्षणासाठी द्वितीय वर्षाला आहे.

अन् वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू –
लक्ष्मणचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे. तसेच बहिणीचे लग्न झाले असून लहान भाऊ सध्या बीएससी (काम्प्युटर) द्वितीय वर्षाला आहे. दरम्यान, आपल्या मुलाची तलाठीपदी निवड झाल्याची माहिती मिळताच शेतात काम करण्याऱ्या लक्ष्मणच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि खूप मोठा आनंद त्यांना त्यावेळी झाला. माझ्या यशात आई-वडील, धुळ्यात ज्यांच्याकडे राहिलो असे माझे मामा-मामी, काका-मावशी यांचा मोठा वाटा असल्याचे लक्ष्मण महाजन यांनी सांगितले. तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करत असाताना धुळ्यातील माझी बहिण/मैत्रीण विशाखा शिंदे हिने मला भावनिक आधार दिला असल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे विशाखा शिंदे या तरूणीची देखील तलाठीपदी नियुक्ती झाली आहे.

लक्ष्मणची तलाठीपदी नियुक्त झाल्यानंतरची प्रतिक्रिया –
लक्ष्मण महाजनने सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना सांगितले की, माझे मुख्य लक्ष हे राज्य सेवेचे असताना तलाठी पदी निवड होणे अनपेक्षित होते. पण यामध्ये घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी माझ्यासाठी हा निकाल महत्वाचा होता. तलाठी पदाची भरती प्रक्रिया पार पडत असताना यासंदर्भात राज्यात विविध घडामोडी घडत होत्या, तलाठी भरती रद्द होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत स्वतःला स्थिर करत अभ्याससाठी प्रेरित ठेवणे आव्हानदायक होते. दरम्यान, माझी आता जरी तलाठी पदी निवड झाली असली तरी पुढील ध्येय राज्यसेवा परिक्षा हेच राहणार असल्याचे लक्ष्मण महाजन या युवकाने सांगितले.

तरूणांसाठी केले आवाहन –
लक्ष्मणने तरूणांना आवाहन करत सांगितले की, जर आपल्याला कुठल्याही क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी विशेषतः सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सुरूवातीला काही वर्षांचा संघर्ष करावा लागतो. खडतर मेहनतीतून पुढे जावे लागते. तसेच आपण ज्या परिक्षेसाठी तयारी करतोय त्या परिक्षेच्या निकालाचा दिवस डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. कारण हाच दिवस आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल करणारा ठरतो. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना सुरूवातीची 4 ते 5 वर्ष संघर्ष केल्यास आपण यशस्वी झालो तर आपले आयुष्य सार्थकी लागते, असा सल्ला देखील त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांसाठी दिला.

हेही वाचा : Special Story : पाचोरा तालुक्याच्या कन्या विद्या पाटील यांची गरूडझेप, लग्नानंतर तब्बल चार वेळा एमपीएससी परीक्षा पास, अत्यंत प्रेरणादायी कहाणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: lakshman mahajantalathi bhartitalathi bharti 2024talathi recruitment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page