संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 6 एप्रिल : देशभरासह राज्यात आज भारतीय जनता पक्षाचा 44 वा स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, पारोळा येथील माजी खासदार ए.टी. पाटील यांच्या संपर्क कार्यालयात भाजपचा 44 वा स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.
माजी खासदार ए.टी. पाटील यांनी मनोगतात सांगितले की, भाजपचे अगोदर दोन खासदार होते. आज तीनशे खासदार आहेत व ह्या निवडणूकीत आपल्याला 400 खासदारांचा आकडा पार करावयाचा आहे. त्याप्रमाणे आपल्याला काम करायचे आहे व भाजपाचा खासदार निवडून द्यायचा आहे.
ते पुढे म्हणाले की, आगामी नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपचे उमेदवार विजयी होणार, या विचाराने आपल्याला काम करायचे आहे, असे आवाहन माजी खासदार ए.टी. पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच सुरेंद्र बोहरा यांनी भाजपाचा 1980 पासून ते आजपर्यंतचा लेखाजोखा मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धिरज महाजन यांनी केले. यावेळी रेखाताई चौधरी, गोपाल शेठ अग्रवाल, नाना सुकदेव, रवींद्र पाटील, मुंकुंदा चौधरी, सचिन गुजराथी, नरेंद्र राजपूत, अनिल टोळकर, सुनील शिरसमणीकर, जितैंद्र चौधरी, विनोद हिंदूजा, गोपाल शेठ दाणेज, समिर वैद्य, जितैंद्र चौधरी, विनोद हिंदूजा, संकेत दाणेज, हर्षल पाटील, नितीन शेलार, विनित पाटील, गणैश पाटील, समाधान पाटील विजय मेटकर, मुकेश बारड, सुदाम चौधरी, दिलिप चौधरी, शाम पाटील, आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : Breaking : मोठी बातमी! जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप, एकनाथ खडसे भाजपात जाणार?






