चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 2 एप्रिल : देशभरासह राज्यात विविध टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी करत त्यांच्या निवडणुकीसाठी अंतिम नावाची घोषणा करण्यात येत आहे. अशाच प्रकारे जळगाव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरून नेमके किती उमेदवार निवडणूक लढवत आहेत, हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
जळगाव लोकसभा मतदारसंघाची प्रमुख लढत –
जळगाव लोकसभा मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घडामोडी पाहायला मिळाल्या. यामध्ये जळगाव लोकसभेचे तत्कालीन खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर उन्मेश पाटील यांनी करण पवार यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, ठाकरे गटाकडून उन्मेश पाटील यांच्याऐवजी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून स्मिता वाघ तर महाविकास आघाडीकडून करण पवार यांच्यात प्रमुख लढत पार पडत आहे.
जळगाव लोकसभेसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे –
हेही वाचा : उज्ज्वल निकम यांनी राजकारणातील ‘एन्ट्रीवर’ दोन वर्षांपुर्वीच केले होते भाष्य, नेमकं काय म्हणाले होते?