ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. दरम्यान, यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात 2.12 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, पाचोरा येथील एस. एस. एम. एम. कॉलेजचा निकाल एकूण 94.89% इतका लागला. यामध्ये विज्ञान शाखेत 91% गुण मिळवत भावेश कणखरेने प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच वाणिज्य शाखेत सुषमा सावंतने 80.67 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकवला. तर चंचल जाधवने 81.17% मिळवत कला शाखेत प्रथम क्रमांक पटकवला.
पाचोरा येथील एस.एस.एम.एम. कॉलेजचा निकाल –
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तथा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा काल निकाल जाहीर झाला.
फेब्रुवारी/मार्च 2024 एच.एस.सी.(इ. 12 वी) परीक्षा निकाल –
1.परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी:- 822
2.परीक्षेत उत्तीर्ण एकूण विद्यार्थी:-780
3.उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी:-94.89%
विज्ञान विभाग –
1. परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी :- 401
2. परीक्षेत उत्तीर्ण एकूण विद्यार्थी :- 399
3. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी :- 99.50%
विज्ञान विभाग गुणवत्ता यादीतील विद्यार्थी –
1. कणखरे भावेश शशिकांत :- 91%
2. विसपुते सिद्धांम धीरज :- 88.83%
3.पाटील वैभव संजय :- 88.33 %
कला विभाग गुणवत्ता यादीतील विद्यार्थी –
1.परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी:- 313
2.परीक्षेत उत्तीर्ण एकूण विद्यार्थी:- 280
3.उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी:- 89.45%
कला विभाग गुणवत्ता यादीतील विद्यार्थी –
1.कु. जाधव चंचल कांतीलाल 81.17%
2 कु. देहडे पल्लवी महेंद्र 76.83%
3.कु. पाटील यातिका उमेश 75 %
वाणिज्य विभाग गुणवत्ता यादीतील विद्यार्थी –
1.परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी :- 102
2.परीक्षेत उत्तीर्ण एकूण विद्यार्थी :- 101
3.उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी :- 99%
वाणिज्य विभाग गुणवत्ता यादीतील विद्यार्थी –
1. सावंत सुषमा रमेश :- 80.67%
2. लिंगायत राधिका सतीश :- 79 %
3. वाघ जानवी सुरेश :- 78.50%
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग –
1. परीक्षेत प्रविष्ट एकूण विद्यार्थी :-35
2. परीक्षेत उत्तीर्ण एकूण विद्यार्थी :-35
3. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी :- 100%
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम गुणवत्ता यादीतील विद्यार्थी:-
मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट
1) प्रथम कु. सपकाळे करुणा रघुनाथ :- 69.83%
2) द्वितीय कु. जाधव सोनाली सुभाष :- 68.67%
3) तृतीय कु. पाटील पल्लवी संदीप :- 68.50%
मेडिकल लॅब टेक्निशियन
1) प्रथम कु वाघ प्रेरणा बहिरम :- 63.67%
2) द्वितीय पाटील प्रमोद पंढरीनाथ :- 60%
3) तृतीय शिंपी सोमनाथ बालू :- 56.67%
अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट
1) प्रथम निकम अभिजीत उत्तम :- 60.67%
2) द्वितीय खान शोएब फिरोज :- 60%
3) द्वितीय इनामदार समीर शहाजहान :- 60%
4) तृतीय सय्यद शोएब सय्यद :- 56.33%
दरम्यान, वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पाचोरा तालुका सहकारी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हॉइस चेअरमन व्ही टी.जोशी, मानद सचिव महेश देशमुख, स्थानिक शालेय समिती चेअरमन सुभाष तोतला, प्राचार्य डॉ शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ वासुदेव वले, डॉ जे व्ही पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा एस. एस. पाटील, प्राध्यापक बंधू-भगिनी या मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन केले.
हेही वाचा : सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी