• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

गोवाल पाडवी : महाराष्ट्रातून यंदा संसदेत निवडून जाणारे सर्वात तरूण खासदार, आतापर्यंतचा ‘असा’ राहिलाय त्यांचा जीवनप्रवास

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 6, 2024
in नंदुरबार, खान्देश, ताज्या बातम्या
गोवाल पाडवी : महाराष्ट्रातून यंदा संसदेत निवडून जाणारे सर्वात तरूण खासदार, आतापर्यंतचा ‘असा’ राहिलाय त्यांचा जीवनप्रवास

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नंदुरबार, 6 जून : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉक्टर विरुद्ध वकील अशी जोरदार रंगलेल्या लढतीत काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांनी दोन वेळा खासदार राहिलेल्या भाजपच्या डॉ. हिना गावीत यांचा पराभव केला. पाडवी यांनी गावीत यांचा तब्बल 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. दरम्यान, गोवाल पाडवी यांनी मतदारसंघातून अवघ्या 31 व्या वर्षी निवडून येत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वात कमी वयात खासदार बनण्याचा मान मिळवला आहे.

कोण आहेत गोवाल पाडवी? –
नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून के. सी पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. मतदारसंघातील काँग्रेसचा युवा चेहरा म्हणून गोवाल पाडवी यांच्याकडे पाहिले गेले. यामुळे त्यांनी हिना गावीत यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली. गोवाल पाडवी यांचा ऑगस्ट 1992 मध्ये जन्म झाला. दरम्यान, त्यांनी वकिलीचे शिक्षण घेत असताना मुंबई विद्यापीठातून 2015 साली एलएलबी तर 2017 साली एलएलएम पुर्ण केले. पाडवी सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असून ‘सायबर लॉ’मध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कायद्यांचाही गोवाल पाडवी यांचा अभ्यास आहे.

हिना गावीत यांचा केला पराभव –
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालकिल्ला राहिला असताना 2014 साली राज्याचे कॅबीनेट मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ. हिना गावीत यांनी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून येत काँग्रेसला धक्का दिला होता. यानंतर हिना गावीत यांनी सलग दहा वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी माजी मंत्री के.सी. पाडवी यांचा पराभव केला होता. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत माजी मंत्री के.सी. पाडवी यांचेच पुत्र गोवाल पाडवी यांनी हिना गावीत यांचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव करत वडिलांचा पराभवाचा बदला काढला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारात आली होती. तेव्हापासून या मतदारसंघात काँग्रेसच्या बाजून वातावरण निर्मिती सुरूवात झाली होती. यानंतर प्रचारादरम्यान काँग्रेसने मतदारांच्या मतपरिवर्तनासाठी केलेले प्रयत्न हेच गोवाल पाडवी यांच्या विजयासाठी महत्वाचे ठरले आहेत.

हेही वाचा : Smita Wagh : विजयानंतर स्मिता वाघ Special Interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: adv gowaal padaviheena gavitloksabha election resultmp gowaal padavinandurbar loksabhanandurbar news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page