संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा/जळगाव, 6 जून : जळगाव जिल्ह्यातील गावांना पोखरा योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू असून लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोखरा 2.0 ची गावांची यादी ही मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील प्रकाश देवरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे सुनील देवरे यांनी सांगितल्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील गावांना पोखरा योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोखरा 2.0 ची गावांची यादी ही मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ही योजना जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने चालते तर यात फक्त जळगाव जिल्हाच नसून महाराष्ट्रातील बहुतांश गावांचा समावेश करण्यात येणार आहे.
काय आहे पोखरा योजना? –
पोखरा योजना ही योजना महाराष्ट्राची योजना आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजनेंतर्गत, हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने जागतिक बँकेच्या आर्थिक सहाय्याने राबविण्यात येत असून यासाठी आतापर्यंत 421 कोटी 86 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. पोखरा योजनेत खर्च झालेल्या रकमेपैकी 200 कोटी रुपये राज्य सरकारने दिले असून, दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये आत्महत्या रोखण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
हेही वाचा : तब्बल 53 वर्षांनंतर स्मिता वाघ यांच्या रूपाने अमळनेरच्या वाट्याला आली मोठी संधी!