चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 10 जून : नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा काल शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. दरम्यान, रक्षा खडसेंना देखील केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाले आहे. दरम्यान, यावरून संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर जोरदार टीका केलीय.
सामनातून फडणवीस-महाजनांवर टीका –
संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रेलखात म्हटल्याप्रमाणे, रक्षा खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा महाराष्ट्रातील फडणवीस -गिरीश महाजन यांच्या कपटी राजकारणास दिल्लीने दिलेली चपराक आहे व त्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष श्रम घेतलेले दिसतात. महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री होतील, असे फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते. ते यावेळी घडले नाही, असेही राऊत यांनी म्हटलंय.
सामनाच्या अग्रलेखावर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया –
पक्षासाठी मी काही जे योगदान दिले आहे. त्या कार्याची पावती मला पक्षाने दिली. जोपर्यंत मी माझी भूमिका स्पष्ठ करत नाही तोपर्यंत कुणालाच यापद्धतीची भूमिका मांडण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून सामनातील अग्रलेखात माझ्या मंत्री पदाविषयी जे लिहिलंय ते चुकीचे असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. नाथाभाऊंमुळे माझे तिकीट कापले जाणार अन् मी एनसीपीत जाणार, आज एवढी परिस्थिती असताना देखील माझ्यावर देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजप नेत्यांनी विश्वास दाखवला आणि निवडून आणले. म्हणून स्थानिक पातळीवर काही वाद असतील पण नेतेमंडळींना मला कधी दूर केले नाही. दरम्यान, मला मिळालेल्या मंत्रीपदामध्ये राज्यातील नेत्यांचा देखील योगदान असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले.
आधीपासूनच भाजपमध्ये राहायचे ठरवले –
रक्षा खडसे पुढे म्हणाल्या की, मागच्या काळात नाथाभाऊंना व्यक्तिगत कारणामुळे राजकारणात जावे लागले. पण सर्वांना मला त्यावेळी सांभाळले. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण देवेंद्र फडणवीसांनी मला विश्वास दिला आम्ही सगळे तुझ्यासोबत असल्याचे सांगत प्रामाणिकपणे काम करण्याचेही त्यांनी सांगितले होते.
माझी राजकीय सुरूवात ही भारतीय जनता पार्टीपासून सुरू झालेली आहे. आणि आज भारतीय जनता पक्षाचे विचार सोबत घेऊन मी माझे राजकीय करिअर केले आहे. आमच्या पक्षाची विचारधारा मनाला स्विकारणारी आहे. मला खासदारकी मिळो अथवा ना मिळो मला भाजपमध्येच राहायचे होते, हे मी आधीपासूनच ठरवले होते.
माझ्याबाबतीत त्यांनी राजकारण मध्ये आणले नाही –
सगळा राजकीय दबाव सांभाळून देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर विश्वास दाखवला. तसेच गिरीश महाजन यांनी देखील मला संधी देत सगळ्यांना सांगितले आणि निवडून आणण्याची भूमिका घेतली. आज गिरीश महाजन आणि नाथभाऊंमध्ये कितीही टोकाचे संबंध असतील तरीही त्यांनी माझ्याबाबतीत राजकारण मध्ये आणले नाही. नाथाभाऊंची मी सून आहेच पण गिरीश काकांनी देखील मला मुलगी म्हणून पुढे ठेवले. म्हणून मला वाटते.
हेही वाचा : “महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार त्यांच्या मुळ पक्षात परतणार!” काँग्रेस नेत्याचा मोठा दावा