भडगाव , 14 मार्च: भडगाव लुक्यातील भातखंडे येथील .प. मराठी शाळेत बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेट ह्या पशुखाद्य कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व आणि सौजन्याने कंपनीचे सेल्स मॅनेजर श्री तुषार बाविस्कर यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच प्रयत्नाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्टीलचे उत्तम प्रतीचे टिफिन डबे आणि टिफीन बॅग मोफत वाटप करण्यात आल्या.
आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करावा हा उदात्त हेतू समोर ठेवून बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या गावातील शाळेची निवड करून सर्व विद्यार्थ्यांना स्टीलचे टिफीन डबे दिले.
ह्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन बागुल, ह.भ.प.मदन अण्णा, बटा भाऊ, आनंदा पाटील, बुधा सोनवणे, प्रल्हाद पाटील, शाम महाजन, ईश्वर कदम आदी ग्रामस्थ हजर होते. यावेळी बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेटच्यावतीने विद्यार्थ्यांना टिफिन डबे आणि टिफीन बॅग मोफत वाटप करण्यात आल्याबद्दल उपस्थितांनी आभार मानले.






