मुक्ताईनगर, 13 जून : विस्थापितांना न्याय मिळवून देणे हीच मानवाधिकाराची भूमिका असल्याचे प्रतिपादन प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांनी केले. मानवाधिकार संघटनेच्या मुक्ताईनगर तालुका संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा ओळखपत्र व नियुक्तपत्र वाटप सोहळा काल पार पडला. यावेळी दुसाने बोलत होते.
विस्थापितांना न्याय मिळवून देण्याची भूमिका –
राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शशिकांत दुसाने यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा अधीक्षक प्रविण पाटील यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा ओळखपत्र व नियुक्तपत्र सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी दुसाने यांनी संघटनेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. सुरूवातीला संघटनेची स्थापना तसेच संघटनेच्या सध्यास्थितीतील कार्याविषयी माहिती करून दिली. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. आणि म्हणून विस्थापितांना न्याय मिळवून देणे, हीच मानवाधिकाराची प्रमुख भूमिका असल्याचे दुसाने यांनी स्पष्ठ केले.
मुक्ताईनगरात पार पडला ओळखपत्र व नियुक्तपत्र वाटप सोहळा –
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने व प्रविण पाटील यांच्या हस्ते संघटनेतील पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रासह नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी दुसाने यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत समाज कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दुसाने यांनी पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदानुसार पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदारींविषयी माहिती दिली. तसेच समाजासाठी कार्य करत असताना आपली संघटना तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दुसाने यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ताईनगर तालुका अधीक्षक मोहन मेढे यांनी केले. तसेच बळीराम दौलतराव गवई, शेख हकीम रशीद मन्यार, जगन्नाथ रामकृष्ण चांगदेवकर, विजय प्रल्हाद खराटे यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष भास्कर जंजाळकर यांनी केले. समारोप सचिव शेख हकीम शेख रशीद मन्यार यांनी केला.
मानवाधिकार संघटनेच्या मुक्ताईनगर तालुका नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी –
1. अधीक्षक, मोहन कौतुक मेढे
2. अध्यक्ष, भास्कर प्रल्दाद जंजाळकर
3. उपाध्यक्ष, जगन्नाथ रामकृष्ण चांगदेवकर
4. सचिव, शेख हकीम शेख रसीद मन्यार
5. उपसचिव, पंकज आत्माराम वंजारी
6. कार्याध्यक्ष, बळीराम दौलतराव गवई
7. हेड जनसंपर्क अधिकारी, रामदास नारायण सुतार
8. जनसंपर्क अधिकारी, विजय प्रल्हाद खराटे
9. संघटक, धनंजय रामदास सापधरे
10. सहसंघटक, चंद्रकांत शंकर रावाये
हेही वाचा : Smita Wagh Special Interview : आपल्या मुलांसाठी मतदारसंघाला कर्मभूमी बनवणार – खासदार स्मिता वाघ