सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 9 जुलै : पारोळा शहरात असलेल्या कुटीर रूग्णालयाचे ग्रामीण रूग्णालयातून उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर होणार आहे. यासाठी सरकारकडून 38 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
कुटीर रूग्णालयात ‘या’ सुविधा होणार उपलब्ध –
कुटीर रूग्णालयाला सरकारकडून ट्रामा केअर, मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी 38 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून त्याठिकाणी पारोळा तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हायटेक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामास मंजुरी –
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन पारोळा येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धीत मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामास मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, आमदार चिमणराव पाटील यांनी आमदार झाल्यापासुन कुटीर रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय होऊन येथेच रूग्णांना उपचार मिळणेसाठी आवश्यक तो पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा