• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाकडून ‘या’ दिवशी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, न्यायालयातील वाद मिटविण्याची सुवर्णसंधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 26, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाकडून ‘या’ दिवशी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, न्यायालयातील वाद मिटविण्याची सुवर्णसंधी

जळगाव, 26 जुलै : वर्षानुवर्षे ऐनकेन कारणाने प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपुर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत दि. 27 जुलै आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव तर्फे देण्यात आली. याचा अधिकाधिक लोकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून करण्यात आले आहे.

लोकन्यायालय म्हणजे काय? –
वाद उद्भवला तर तो शक्य तोवर सामंजस्याने सोडवावा ही आपली प्राचीन परंपरा आहे. गावातील जुनी जाणती माणसे एकत्र येत आणि कोणत्याही व्यक्तींमध्ये उद्भवलेला वाद समजुतीने मिटवत. ज्यांच्यापुढे वाद जाई ते गावातील आदरणीय आणि निष्पक्षपाती लोक असत. त्यालाच गावात गावपंचायत असे म्हणत सध्याचे लोक न्यायालय म्हणजे या गावपंचायतीचे आधुनिक रूप जेथे कायदा जानणाऱ्या निष्पक्षपाती लोकांचे न्याय मंडळापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोड घडविते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव तर्फे सांगण्यात आले की, मा. ना. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हात या लोकअदालतीचे आयोजन केलेले असुन विधी सेवा प्राधिकरण, जळगांव व जिल्हा वकील संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी ही राष्ट्रीय लोकअदालत जळगाव जिल्हातील संपुर्ण न्यायालयात आयोजित केली जाईल. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. क्यु. एस. एम. शेख साो. तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे अध्यक्षतेखाली लोकअदालतीस प्रारंभ होईल.

ही प्रकरणे तडजोडीने मिटवता येतील –
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॉफीक चलान, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले इ. चे व खटला दाखल पुर्व प्रकरणे तसेच एकुण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपुर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत.
राष्ट्रीय लोकअदालतीचे फायदे असे की, निकाल झटपट लागतो, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात, निकाल झटपट लागतो, लोकन्यायालयाच्या निवाडया विरूध्द अपील नाही एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते, लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने कोणाचा ना जय होतो, ना हार होते, लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो, परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुता ही निर्माण होत नाही, कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाडयाची अमंलबजावणी कोर्टामार्फत करता येते, वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होते, लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायदयानुसार कोर्ट फि ची रक्कम मिळते.

त्याचप्रमाणे जळगांव येथील औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोड योग्य प्रकरणे देखिल त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली केले जाणार आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपुर्ण जिल्हातून मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपनी यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसुली होवुन मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व खटल्यांमध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वणी कंपन्या, दुरध्वणी कार्यालयांनी थकीत रकमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्थावित केलेले आहे.

ज्या पक्षकारांना तडजोडीने सदरचे आपली प्रकरणे निकाली काढायची असतील अशा संबंधीत सर्व पक्षकार व त्यांचे विधिज्ञ यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवायचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, व जास्तीत जास्त खटले 27 जुलै रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीत समोपचाराने निकाली करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव तर्फे करण्यात आलेले आहे.

हेही वाचा : मुलींकडून शिक्षणासाठी फी घेतल्यास महाविद्यालयांवर कारवाई, ‘अशी’ घेतली जाणार तक्रारीची दखल, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district latest newssuvarna khandesh liveजळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकारणराष्ट्रीय लोक अदालत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमचं लक्ष्य फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; त्यामध्ये 100 टक्के भगवा फडकवायचाय! – आमदार किशोर आप्पा पाटील

आमचं लक्ष्य फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; त्यामध्ये 100 टक्के भगवा फडकवायचाय! – आमदार किशोर आप्पा पाटील

June 28, 2025
Incomings continue in Pachora Shiv Sena Hundreds of youths join party in presence of MLA Kishor Appa Patil

Pachora Shivsena : पाचोरा शिवसेनेत इनकमिंग सुरूच! शेकडो तरूणांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते प्रवेश

June 28, 2025
An incident that shook Maharashtra! Murder of a female Kirtankar in Chhatrapati Sambhajinagar

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! छत्रपती संभाजीनगरमध्ये किर्तनकार महिलेची हत्या, नेमकं काय घडलं?

June 28, 2025
KBCNMU signs 9 MoUs with Maharashtra Government and various industry and professional organizations

महाराष्ट्र शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्थांसोबत KBCNMU ने केली 9 सामंजस्य करारावर स्वाक्षरी

June 28, 2025
SIT formed in the murder case of a minor boy in Erandol, orders from Jalgaon Superintendent of Police

मोठी बातमी!, एरंडोलमधील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी SIT स्थापन, जळगाव पोलीस अधीक्षकांचे आदेश, आतापर्यंत काय काय घडलं?, संपूर्ण माहिती

June 28, 2025
पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

June 27, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page