सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 18 ऑगस्ट : पारोळा येथील कै. ह. ना. आपटे मोफत नगर पालिका वाचनालयाच्यावतीने नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसचे जलसंपदा विभाग आणि पोलीस भरतीसाठी लागलेल्या निकालात यश मिळवलेल्या विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये पारोळा शहरातील प्रफुल कैलास कोकंदे याची पीएसआयपदी, पारोळ्यातील परेशकुमार शांताराम साळुंखे याची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून तर वेल्हाणे येथील योगश प्रदीप पाटील याची महाराष्ट्र पोलीसमध्ये शिपाई पदावर निवड झाली. दरम्यान, हे तीनही जण पारोळा नगरपालिका स्पर्धा परिक्षा वाचनालयाचे विद्यार्थी असून त्यांचा वाचानालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पारोळा येथील कै. ह. ना. आपटे मोफत नगर पालिका वाचनालय –
पारोळा नगर पालिकेचे वाचनालयाची स्थापना 1 एप्रिल 1950 रोजी झाली असून ते “अ” वर्ग तालुका वाचनालय आहे. वाचनालयात कथा, कादंबरी, ऐतिहासिक, नाटक, आत्मचरित्र्य, प्रवासवर्णन, आध्यात्मिक, इत्यादि एकूण 25,250 पुस्तके आहेत. सन 2021 साली तत्कालीन नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील व सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत यांनी शहरातील तसेच ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच इतर परिक्षाचा अभ्यास करणेकामी जळगाव धुळे नाशिक, पुणे याठिकाणी जावे लागत असून परिस्थितीमुळे तेथील खर्च देखील परवडत नसलेने नगर पालिका वाचनालया तर्फे शहरातील तसेच ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय कमी मासिक वर्गणी घेवून जुलै 2021 मध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू केली.
आजपावेतो या वाचनालयातून जवळपास 10 ते 12 विद्यार्थी विविध परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 1 PSI, 1 सहायक अभियंता जलसंपदा विभाग, 3 महाराष्ट्र पोलिस, 2 बीएसएफ जवान, 1 आरोग्यविभाग सहायक, 1 आर्मी, 1 नर्सिंग ऑफिसर, 2 मंत्रालय सहायक असे निवड झालेले विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, अतिशय कमी कालावधीत या वाचनालयाची यशाकडे वाटचाल सुरू असल्याचे यावरून दिसते. तरी याकामी मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण, अभ्यासिका प्रमुख श्रीमती संघमित्रा संदानशिव, अभ्यासिका उपप्रमुख राहुल साळवे, सहायक ग्रंथपाल अभिजीत मुंदाणकर तसेच नगर पालिका प्रशासनाचे वतीने प्रयत्न केले जात आहे.
हेही वाचा : 11 महिन्यांचा असताना वडिलांचं निधन, मामाकडे राहून शिकला अन् पारोळ्याचा प्रफुल झाला PSI, प्रेरणादायी स्टोरी