• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

badlapur school case : बदलापूरच्या घटनेवरुन रोहिणी खडसेंचा तीव्र संताप, सरकारला धरलं धारेवर, म्हणाल्या….

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 21, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
rohini khadse on badlapur case

रोहिणी खडसेंची सरकारवर जोरदार टिका

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव : एका लहानशा चिमुरडीवर अत्याचाराची घटना ही अत्यंत क्लेशदायी आणि वेदनादायी आहे. सुसंस्कृत अशा महाराष्ट्रात, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्या खरंच महाराराष्ट्राच्या जनतेची मान खाली घालणाऱ्या आहेत, या शब्दात घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

बदलापूरमध्ये एका शाळेत झालेल्या लहान मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. समाजातून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. त्यातच आता या घटनेवरुन रोहिणी खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

बदलापूर येथे घडलेली, एका लहानशा चिमुरडीवर अत्याचाराची घटना ही अत्यंत क्लेशदायी आणि वेदनादायी आहे. सुसंस्कृत अशा महाराष्ट्रात, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्या खरंच महाराराष्ट्राच्या जनतेची मान खाली घालणाऱ्या आहेत. आज एका चिमुरडीवर जी घटना घडली आहे, तिच्यावर अत्याचार करणारे जेवढे दोषी आहेत, तेवढेच दोषी, तेथील पोलीस कर्मचारी आहेत, ज्यांनी 12 तास हा गुन्हा नोंदवायला वेळ घेतला. आज त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं अपेक्षित आहे.

आज निरपराध मुलींवर ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत, या घटना हेच दाखवतंय की, या महाराष्ट्रातील आज आम्ही महिला सुरक्षित नाही आणि आज कितीही सरकार, लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून 200 कोटी रुपये खर्च करुन जो प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करतंय, पण हे आजची जी घटना आहे किंवा गेल्या अनेक दिवसांत ज्या घटना घडल्या त्या सरकारचे डोळे उघडणाऱ्या घटना आहेत.

आम्हाला लाडक्या बहिणींचे 1500 रुपये नको आहेत, तर आम्हाला सुरक्षित वातावरण महाराष्ट्रात अपेक्षित आहे. कारण आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार आहे आणि एक महिला, बहिणी बाहेर पडल्यानंतर त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि बदलापूरची घटना हे दाखवून देत आहे की, सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे. या निर्लज्ज सरकारला आम्ही सर्व महिला विचारतोय की, आम्हाला सुरक्षित असं वातावरण हवं आहे. आम्हा महिलांना, आमच्या मुलींना, आमच्या बहिणींना एक सुरक्षित वातावरण देणे तुमची जबाबदारी आहे.

आज सर्व जबाबदारी स्विकारुन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा देऊन त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवली गेली पाहिजे आणि याबाबतचा निर्णय लवकरात लवकर सरकारने घेणे अपेक्षित आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

बदलापुरात उद्रेक, 8 तासांपासून रेलरोको

बदलापूरमध्ये 3 वर्षांच्या मुलींवर शाळेत अत्याचाराच्या घटनेनंतर संतापाचा उद्रेक झाला. यानंतर मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात पालकांसह नागरिकांनी आंदोलन केले. सकाळी 6 वाजेपासून रेल्वे स्थानकात आंदोलकांनी जमायला सुरुवात केली. त्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर उतरत रेल रोको आंदोलन सुरू केले. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला. 30 लोकल गाड्या रद्द केल्या गेल्या. तर 11 लोकल वळवण्यात आल्या. याशिवाय काही एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावत आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Badlapurbadlapur caserohini khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page