नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शिखर धवनने आज सकाळी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट करत निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय. त्या व्हिडीओत त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, 2010 साली क्रिकेटच्या माध्यमातून भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या शिखर धवनने 2024 मध्ये निवृत्ती जाहीर केल्याने जवळपास त्याची 15 वर्षांची कारकिर्द संपली आहे.
शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर –
शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केला असून याबाबतच 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये धवनने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसी अशा सर्वांचे आभार मानत धवनने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं म्हटलंय.
शिखर धवनचे करिअर –
शिखर धवन भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज होता. आतापर्यंत संघासाठी त्याचे मोठे योगदान राहिलंय. शिखर धवनने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय तसेच 68 टी-20 सामने खेळलेले आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 7 आणि वन डे मध्ये 17 शतके त्याने त्याच्या कारकिर्दीत झळकावली. दरम्यान, आयपीएलमध्ये तो एकूण 222 सामने खेळले असून यामध्ये एकूण 6 हजार 769 धावा त्याने बनवल्या. आयपीएलमध्ये एकूण 51 अर्धशतके आणि 2 शतके त्याच्या नावावर नोंद आहेत. झळकावलेली आहेत. दरम्यान, 38 वर्षीय शिखर धवन साधारण 2022 पासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता. त्यानंतर आता त्याने थेट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय.
रोहित-धवनची जोडी ठरली होती हिट –
शिखर धवन हा भारतीय 2013 सालापासून सलामीचा फलंदाज राहिलाय. भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघेही 2013 साली सलामीला फलंदाजी करण्यासाठी यायचे. यावेळी स्फोटक फलंदाजी करण्याचा त्यांचा पवित्रा होता. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर असताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनी सलामीला फलंदाजीला येत अक्षरशः ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली होती. तेव्हापासून रोहित-धवनची जोडी सलामीच्या फलंदाजीसाठी हिट ठरली होती.