जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे आयोजित लखपती दीदी कार्यक्रमात सहभागी होणार असून ते या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचे वाटप करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान या कार्यक्रमात बचत गटांना सुमारे पाच हजार कोटी रूपयांचा फिरता निधी आणि कर्जही प्रदान करणार आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. तर मग या कार्यक्रमाला कोण-कोण उपस्थित राहणार हे जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आज जळगावात या मान्यवरांची उपस्थिती
- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान
- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (क्रीडा व युवक कल्याण)
- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर (दूरसंचार व ग्रामविकास)
- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (आयुष व आरोग्य आणि कुटुंब कल्याण)
- केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान (ग्रामविकास)
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार
- आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित
- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
कार्यक्रमाच्या आधी कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा –
आज जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लखपती दीदी संमेलनाच्या ठिकाणाची पाहणी केंद्रीय ग्रामविकास, कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. तसेच अधिकाऱ्यांसोबत व्यवस्थेचा आढावा घेतला. चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी आगमनाचा मार्ग, मंच आणि बैठक व्यवस्थेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा, रविवारी अजिंठा चौफुली ते नेरी मार्ग बंद, वाहतुकीत असा बदल..