मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 19 सप्टेंबर : आयडियल इंग्लिश अकॅडमीतर्फे ध्यान (मेडिटेशन सेशन) आयोजन करण्यात आले. आयडियल इंग्लिश अकॅडमीचे संचालक पद्माकर पाटील यांनी ध्यानाचे महत्त्व लक्षात घेऊन या तासिकेचे आयोजन केले. आयडियल इंग्लिश अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या सेशनचा लाभ घेतला.
सर्व विद्यार्थ्यांना सकाळी ओम शांती केंद्र चोपडा येथे ध्यानासाठी नेण्यात आले. ध्यान केंद्रात मंगला दीदी व तेजल दीदी व इतर सदस्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठी खास वक्ता म्हणून आलेल्या तेजल दिदी यांनी विद्यार्थ्यांना ध्यानाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासाठी काय करावे याचे महत्व सांगून विविध शॉर्ट ट्रिक्स दिल्या.
मंगला दीदी आणि विद्यार्थ्यांना नेहमी ध्यान करण्याची प्रेरणा दिली. घनश्याम पाटील (जी आर पाटील) यांनी विद्यार्थ्यांसाठी या शिबिराच्या आयोजनासाठी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार व पुस्तिका देण्यात आली. या कार्यक्रमासाठी अश्विन चौधरी, दिगंबर पाटील, मनोज पाटील, ओम शांती केंद्राचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत
विष्णापूर येथील जि. प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल किट, दप्तर, वह्या व बिस्कीट वाटप
चोपडा तालुक्यातील विष्णापूर येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रीनस्टार फर्टीलायझर्स लिमिटेड व स्पीक फर्टीलायझर लिमिटेड कंपनीद्वारे शाळेतील चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल किट, दप्तर, वह्या व बिस्कीट वाटप करण्यात आले. दप्तर व वह्या कंपनीचे प्रतिनिधी प्रवीण बागुल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह जळगाव जिल्हा व कंपनीचे अधिकृत विक्रेता आशिष कृषी सेवा केंद्र चोपडा, अग्रवाल ट्रेडिंग कंपनी चोपडा, अजिंक्य सेल्स कॉर्पोरेशन चोपडा यांचे प्रोप्रायटर यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना वही व दप्तर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील खालील सदस्य उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण पाटील व हिरालाल पेंढारे ग्रामपंचायत विष्णापूर मा. उपसरपंच सतिलाल धनगर, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, अंकुश माळी, उदयभान इंगळे उपस्थित होते. शाळेतील मुख्याध्यापक मनीलाल पाटील यांनी आलेल्या मंडळींचे स्वागत केले. संदीप महाजन यांनी सूत्रसंचालन केले.